कोल्हापूर : काँग्रेस पक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मानत नाहीत, असं वक्तव्य शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी कोल्हापुरात केलंय. संजय मंडलिक हे सर्वसामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करतात. कोल्हापूरची जनता संजय मंडलिक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि त्यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणेल  अशी प्रतिक्रिया देवरा यांनी दिली.

वर्षा गायकवाड यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळाली नाही यावरही देवरा यांनी भाष्य केले आहे.देवरा यांनी सांगितले की, वर्षा गायकवाड ही माझी बहिण आहे. माझे वडील आणि वर्षा गायकवाड यांच्या वडिलांचे जुने संबंध होते.कॉंग्रेसकडून फक्त एका दलित उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली.त्यामुळे कॉंग्रेस दलित विरोधी आहे हे सिद्ध झालंय.महाविकास आघाडी संधी साधू आघाडी असल्याचही देवरा यांनी म्हटलंय. 

पुढे बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये सहभागी होऊ नका म्हणून मी काँग्रेसला त्यावेळी वारंवार सांगत होतो. महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून दिल्लीतील कोणत्याही नेत्याने बाळासाहेब ठाकरे यांना कधी अभिवादन केलं नाही. महाविकास आघाडीतील पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी ,खोक्यासाठी, खुर्चीसाठी एकत्र आले.मुंबई मध्ये सर्वात मोठा प्रश्न म्हणजे घरांचा आहे. मी सर्व सामान्य नागरिकांना घरं देण्याचा प्रयत्न केला, पण खासदार अरविंद सावंत यांच्या इमारतीची ओसी नाही, तर अरविंद सावंत गोरगरीब जनतेला घरं काय देणार? असा सवालही त्यांनी यावेळी केला.