कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील प्रलंबित विकासकामे पूर्ण करावीत, अशी मागणी आज (मंगळवार) सिटीझन फोरमच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना देण्यात आले.

अंबाबाई मंदिर परिसरातील बाबूजमाल दर्ग्याशेजारील पार्किंग, दत्त मंदिरासमोरील शेड व चौथरा याचे अतिक्रमण काढून पालखी प्रदक्षिणा मार्ग मोकळा करावा, यासह प्रलंबित विकासकामे करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली. तर विविध विकासकामांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. मागण्यांसंदर्भात आम्ही संचालक बैठकीत सविस्तर चर्चा करुन निर्णय घेऊ, असे आश्वासन महेश जाधव यांनी शिष्टमंडळास दिले.

या वेळी संस्थेचे अध्यक्ष प्रसाद जाधव, प्रमोद सावंत, प्रकाश सरनाईक, राजू जाधव, प्रविण पोवार, चंद्रकांत पाटील, किशोर घाडगे, जिजाऊ ब्रिगेडच्या सुधा सरनाईक, वैशाली जाधव, रेश्मा पोवार उपस्थित होत्या.