कागल (प्रतिनिधी) : लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास व त्यांनी उभारलेल्या गड-किल्ल्याविषयी सविस्तर माहिती व्हावी. हा गौरवशाली इतिहास पिढ्यानपिढ्या जपला जावा, यासाठी ‘किल्ले बनवा स्पर्धा’ उपयुक्त आहेत, असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे केले. राजे विक्रमसिंह घाटगे फौंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या भव्य किल्ले बनवा २०२० स्पर्धेचे बक्षीस वितरण घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.  

स्पर्धेतील विजेत्यांची नावे अशी कंसात बनविलेल्या किल्ल्याचे नाव.

लहान गट – प्रमोद शितोळे (सिंहगड) अथर्व सुतार व अथर्व भोपळे (जंजिरा) , शिवतेज पाटील (वासोटा), साई मिञ मंडळ (सिंहगड)

मोठा गट– सौरभ शिंगाडे, गणेश शेळके (सिंहगड), आशिकेत आथणे, विपूल भोपटे (सिंधुदुर्ग), शिवाजी चौक (रायगड), कृष्णेश मगर (रायगड), हिंदवी स्वराज्य (राजगड)

विक्रम चव्हाण व अशोक शिरोळे यांनी गड-किल्ल्यांबद्दल माहिती सांगितली. सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देण्यात आले. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून महेश माने, धोंडीराम पाटील, विक्रम चव्हाण यांनी काम पाहिले.

यावेळी युवराज पसारे, दिलीप घाटगे, संदीप भुरले, गजानन माने, संग्राम परीट उपस्थित होते. स्वागत सुशांत कालेकर यांनी केले. अरुण गुरव यांनी प्रास्ताविक  तर हिदायत नायकवडी यांनी आभार मानले.