नूल (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील नूल परिसरात जागतीक योग दिन साजरा करण्यात आला. इंदिरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूल नूलमध्ये जागतिक योग दिन साजरा झाला. प्राचार्य जे. डी. वडर, पर्यवेक्षक ए. आर. हिरेमठ, जिमखाना प्रमुख एस. बी. घस्ती यांच्या प्रमुख उपस्थितीत ओंकार व महर्षी पतंजली यांच्या प्रतिमांचे पूजन झाले. योग शिक्षक एस. सी. साखरे यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली.

रामलिंग हायस्कूलमध्ये मठाधिपती प.पू. भगवान गिरी महाराज, मुख्याध्यापक आर. के. शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले.  न्यू इंग्लिश स्कूल, खणदाळ येथे मुख्याध्यापक जी. आर. चोथे यांनी प्रतिमा पूजन केले. कुमार विद्या मंदिर नूल, कन्या विद्या मंदिर नूल, रामपूरवाडी, तनवडी, हणमंतवाडी, खणदाळ, खमलेहट्टी, शिंदेवाडी, बसर्गे रस्ता, बाळुमामा वसाहत, येणेचवंडी येथील प्राथमिक शाळांमध्ये योगदिन साजरा करण्यात आला. तसेच येथील विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली.