अ. भा. फुटबॉल फेडरेशनच्या सदस्यपदी मालोजीराजे छत्रपती

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  न्यू दिल्ली येथील अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारिणी सदस्यपदी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि कोल्हापूरचे माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांची बिनविरोध निवड झाली. अ.भा.फुटबॉल फेडरेशनची सन २०२२ ते २०२६ या चार वर्षांकरिता कार्यकारिणी मंडळासाठीची निवडणूक आज झाली. फेडरेशनच्या घटनेनुसार एकूण २३ जणांची कार्यकारिणी समिती असून, त्यामध्ये १७ सदस्यांची (अध्यक्ष, उपाध्यक्ष, एक कोषाध्यक्ष) निवड… Continue reading अ. भा. फुटबॉल फेडरेशनच्या सदस्यपदी मालोजीराजे छत्रपती

‘पन्हाळा तालुका क्रीडा संकुलासाठी जमीन संपादन त्वरित करा’

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुका क्रीडा संकुल लवकरात लवकर स्थापन होण्यासाठी आवश्यक ती जमीन मिळवण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या. जिल्हा क्रीडा संकुल समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहूजी सभागृहात घेण्यात आली. बैठकीला जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे, कार्यकारी अभियंता संजय पाटील, क्रीडा… Continue reading ‘पन्हाळा तालुका क्रीडा संकुलासाठी जमीन संपादन त्वरित करा’

सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा बॅट हातात घेणार

मुंबई (प्रतिनिधी) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा बॅट हातात घेणार आहे. तो रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या हंगामात पुन्हा एकदा सहभागी होण्याची शक्यता आहे. याआधीही त्याने पहिल्या हंगामात भारत लिजेंड्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर करून बराच काळ लोटला; मात्र क्रिकेटप्रेमींमध्ये मराठमोळ्या तेंडुलकरची… Continue reading सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा बॅट हातात घेणार

पवार यांनी हात उंचावत विजयाचा व्यक्त केला आनंद

मुंबई (प्रतिनिधी) : आशिया चषकमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामान्यात भारताच्या विजयानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हात उंचावत आनंद व्यक्त केला. शरद पवार यांच्या या व्हिक्टरी साईनच्या व्हिडीओची सध्या देशभर तुफान चर्चा आहे. भारत-पाक सामन्याचे अवघ्या जगाचे लक्ष लागून होते. शेवट्याच्या षटकात भारताने हा सामान जिंकला. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या तुफीने खेळीने शेवटच्या षटकात… Continue reading पवार यांनी हात उंचावत विजयाचा व्यक्त केला आनंद

शरद इंग्लिश स्कूलचे एब्लो बॉक्सिंगमध्ये यश

कोल्हापूर : यड्राव येथील शरद इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांनी जिल्हा पातळीवर घेण्यात आलेल्या एब्लो बॉक्सिंग स्पर्धेत बाजी मारत पहिल्या तीन क्रमांकाचे मानकरी ठरले. निर्मिती कोष्टी हिने ९ वर्षे वयोगटामध्ये प्रथम क्रमांक, निशांत कोष्टी याने १० वर्षे वयोगटात द्वितीय क्रमांक, तर सिद्धेश गरड याने १२ वर्षे वयोगटात तृतीय क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांची राज्य पातळीवरील निवड चाचणीकरिता… Continue reading शरद इंग्लिश स्कूलचे एब्लो बॉक्सिंगमध्ये यश

पाकिस्तान क्रिकेट संघात चिंतेचे वातावरण, दोन खेळाडू जायबंदी

दुबई : आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानचा पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध रविवारी (दि. २८) सामना होत आहे. या सामन्याआधी पाकिस्तानच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. पाकिस्तानचा प्रमुख डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी दुखापतीमुळे आधीच बाहेर गेला आहे. आता दुसऱ्या प्रमुख गोलंदाजाच्या दुखापतींची चिंता पाकिस्तानला सतावत आहे. मोहम्मद वसिमला पाठदुखीचा त्रास जाणवत असल्यामुळे पाकिस्तानचा संघाची चिंता वाढली आहे.… Continue reading पाकिस्तान क्रिकेट संघात चिंतेचे वातावरण, दोन खेळाडू जायबंदी

आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी वीरेन पाटीलची निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केएसएच्या टेबल टेनिस प्रशिक्षण वर्गातील खेळाडू वीरेन अभिजित पाटील याची जॉर्डन येथील अमान येथे दि.२४ ते २८ ऑगस्ट अखेर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत वीरेन हा भारताकडून ११ व १३ वयोगटात खेळणार आहे. वीरेन हा गेल्या चार वर्षांपासून केएसएचे प्रशिक्षक संग्राम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.… Continue reading आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी वीरेन पाटीलची निवड

प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोनाबाधित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशिया चषकापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोना पॉझिटिव्ह आला असून, तो आशिया चषक स्पर्धेत जाऊ शकेल की नाही याबाबत अजूनही शंका आहे. टीम इंडिया आज (२३ ऑगस्ट) यूएईला रवाना होणार आहे. आशिया चषक या शनिवारपासून म्हणजेच २७ ऑगस्टपासून सुरू होत असून, भारताचा पहिला… Continue reading प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोनाबाधित

राष्ट्रकुल स्पर्धेत पी. व्ही. सिंधूची ‘सुवर्ण’ कामगिरी

लंडन (वृत्तसंस्था) : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीच्या लढतीत कॅनडाच्या मिशेल लीचा पराभव करत पहिले सुवर्णपदक जिंकले. पी. व्ही. सिंधू हिने एकेरीच्या अंतिम सामन्यात तिने कॅनडाच्या जागतिक क्रमवारीत १३ व्या क्रमांकावर असलेल्या मिशेल लीचा सलग दोन गेममध्ये पराभव केला. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावरती असलेल्या पी.व्ही. सिंधूने पहिला गेम २१-१५ असा… Continue reading राष्ट्रकुल स्पर्धेत पी. व्ही. सिंधूची ‘सुवर्ण’ कामगिरी

गडहिंग्लजमध्ये फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ        

गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आयोजित स्पर्धेचे उद्घाटन आ. हसन मुश्रीफ यांनी फुटबॉलला किक मारून केले. या फुटबॉल स्पर्धेमध्ये २४ संघांनी सहभाग घेतला आहे. रुद्राप्पा हत्ती, अप्पासाहेब कोले व शन्मुगम स्मृती चषक गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. १४ व १६ वर्षे अशा दोन गटामध्ये होणाऱ्या या स्पर्धेचे हे अकरावे… Continue reading गडहिंग्लजमध्ये फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ        

error: Content is protected !!