नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशिया चषकापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोना पॉझिटिव्ह आला असून, तो आशिया चषक स्पर्धेत जाऊ शकेल की नाही याबाबत अजूनही शंका आहे. टीम इंडिया आज (२३ ऑगस्ट) यूएईला रवाना होणार आहे. आशिया चषक या शनिवारपासून म्हणजेच २७ ऑगस्टपासून सुरू होत असून, भारताचा पहिला सामना हा २८ तारखेला होणार आहे.

नुकत्याच संपलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हा काही दिवस ब्रेकवर होता. एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वेला पोहोचलेल्या केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाचे प्रशिक्षक म्हणून राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण होते. केएल राहुलच्या नेतृत्वा टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेत ३-० असा दणदणीत विजय मिळवला.

टीम इंडियासाठी कठीण गोष्ट म्हणजे राहुल द्रविड आता कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे आणि अशा परिस्थितीत आशिया कपमध्ये टीम इंडियासोबत उपस्थित राहणे त्याच्यासाठी खूप कठीण आहे. कारण जोपर्यंत तो कोरोना निगेटिव्ह होत नाही आणि त्यानंतर तो फिट होत नाही, तोपर्यंत तो संघासोबत जाऊ शकणार नाही. अशा स्थितीत आशिया कपमध्ये राहुल द्रविडऐवजी व्हीव्हीएस लक्ष्मण संघासोबत कोच म्हणून जाण्याची शक्यता आहे.