मुंबई (प्रतिनिधी) : आशिया चषकमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामान्यात भारताच्या विजयानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हात उंचावत आनंद व्यक्त केला. शरद पवार यांच्या या व्हिक्टरी साईनच्या व्हिडीओची सध्या देशभर तुफान चर्चा आहे.

भारत-पाक सामन्याचे अवघ्या जगाचे लक्ष लागून होते. शेवट्याच्या षटकात भारताने हा सामान जिंकला. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या तुफीने खेळीने शेवटच्या षटकात षटकार मारत भारताला विजय मिळवून दिला. ज्यामुळे हार्दिक पंड्याच्या खेळीने पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम झाला. भारताच्या विजयामुळे अनेक शहरांतील रस्त्या रस्त्यांवर जल्लोष करण्यात आला. शरद पवार यांनी देखील विजयाचा जल्लोष केल्याचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्याने त्याची देशभर चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ११ सेकंदाच्या या व्हिडीओतील पवारांचे क्रिकेटप्रेम पाहून अनेकांची मने  जिंकली आहे.

या व्हिडिओमध्ये शरद पवार आपल्या नातवांसोबत टीव्हीवर भारत-पाकिस्तान सामन्याचा आनंद घेताना दिसत आहे. यात त्यांच्यासोबत पत्नी प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे त्यांची मुलगी रेवती सुळे, मुलगा विजय सुळे दिसत आहे. या व्हिडीओला आता क्रिकेट प्रेमींकडूनही भरघोस प्रतिक्रिया येत आहेच. जिंदादिल इन्सान…” म्हणत अनेक युजर्सनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. अनेकांच्या व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा स्टेट्सवर या व्हिडीओची हवा पाहायला मिळत आहे. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी हा व्हिडीओ ट्विटवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आजचा रविवारचा दिवस आनंदी बनवल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे आभार!’. दरम्यान हा व्हिडीओ आत्तापर्यंत दीड लाखांहून अधिकांनी पाहिला आहे. तर१४ हजारांहून अधिकांनी लाईक्स केला आहे.

दरम्यान,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत भारतीय क्रिकेट संघाचे विजयानंतर कौतुक केले आहे. मोदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे आशिया चषकाच्या सामन्यात भारतीय संघाने उत्तम अष्टपैलू कामगिरी केली. भारतीय संघाने उत्तम कौशल्य आणि चिकाटी दाखवल्याचे त्यांनी म्हटले आहे.