कोल्हापूर : यड्राव येथील शरद इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांनी जिल्हा पातळीवर घेण्यात आलेल्या एब्लो बॉक्सिंग स्पर्धेत बाजी मारत पहिल्या तीन क्रमांकाचे मानकरी ठरले.

निर्मिती कोष्टी हिने ९ वर्षे वयोगटामध्ये प्रथम क्रमांक, निशांत कोष्टी याने १० वर्षे वयोगटात द्वितीय क्रमांक, तर सिद्धेश गरड याने १२ वर्षे वयोगटात तृतीय क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांची राज्य पातळीवरील निवड चाचणीकरिता सहभाग घेता येणार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका कानिज कोतवाल, क्रीडा शिक्षक संदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.