गडहिंग्लजमध्ये फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ        

गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आयोजित स्पर्धेचे उद्घाटन आ. हसन मुश्रीफ यांनी फुटबॉलला किक मारून केले. या फुटबॉल स्पर्धेमध्ये २४ संघांनी सहभाग घेतला आहे. रुद्राप्पा हत्ती, अप्पासाहेब कोले व शन्मुगम स्मृती चषक गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. १४ व १६ वर्षे अशा दोन गटामध्ये होणाऱ्या या स्पर्धेचे हे अकरावे… Continue reading गडहिंग्लजमध्ये फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ        

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला चौथे सुवर्णपदक

लंडन (वृत्तसंस्था) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने चौथे सुवर्ण जिंकले आहे. पाचव्या दिवशी, भारताने महिला लॉन बॉल्सच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १७-१० असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या ९२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय लॉन बॉल्स महिला संघाने पदक जिंकले आहे. लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया आणि रूपा राणी टिर्की या भारतीय खेळाडूंनी सामन्यात… Continue reading राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला चौथे सुवर्णपदक

राष्ट्रकुल स्पर्धेचा आज रात्री उद्घाटन सोहळा

लंडन : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कॉमनवेल्थ गेम्सना आजपासून (२८ जुलै) सुरुवात होत आहे. इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये २८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान पार पडणाऱ्या स्पर्धेत भारताचे १०८ पुरुष आणि १०७ महिला खेळाडू विविध अशा १५ खेळांमध्ये सहभागी होतील. भारतीय संघाचे नेतृत्त्व ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह करणार आहेत. हे… Continue reading राष्ट्रकुल स्पर्धेचा आज रात्री उद्घाटन सोहळा

जयसिंगपूर नगरपरिषदेला क्रीडासंकुलसाठी २० कोटींचा निधी

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : नगरपरिषदांना देण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत जयसिंगपूर नगरपरिषदेला क्रीडासंकुल (स्पोर्टस् कॉम्प्लेक्स) उभारण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. शिरोळ तालुक्यातील खेळाडूंसाठी दर्जेदार सेवा सुविधा देणारे अद्ययावत असे एखादे क्रीडासंकुल असावे, यासाठी… Continue reading जयसिंगपूर नगरपरिषदेला क्रीडासंकुलसाठी २० कोटींचा निधी

नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर

नवी दिल्ली : भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान दुखापत झाली आहे. त्यामुळे तो बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दुखापत झाल्याने तो या स्पर्धेत खेळू शकणार नसल्याची माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेने दिली आहे. रविवारी ओरेगॉन येथे पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत नीरजने ८८.१३ मीटर अंतरावर भालाफेक करून रौप्यपदक जिंकलं… Continue reading नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर

कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे रामदास तडस

मुंबई : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे रामदास तडस यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रामदास तडस हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. तडस हे स्वतः चार वेळा विदर्भ केसरी राहिले आहेत. रामदास तडस यांनी राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्षपद भूषवले आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तीन जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी दोन… Continue reading कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे रामदास तडस

आ. ऋतुराज पाटील यांच्याकडून ऐश्वर्या जाधवचे कौतुक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक टेनिस क्रमवारीमध्ये १४ वर्षांखालील गटात अग्रस्थानी असणारी आणि त्याच गटातून विम्बल्डनमध्ये चमकलेली कोल्हापूरची टेनिसपटू ऐश्वर्या जाधव लंडनहून कोल्हापूरमध्ये दाखल झाली. कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी तिच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत ऐश्वर्याच्या कामगिरीचे कौतुक केले. पहिल्या प्रयत्नात यशाने हुलकावणी दिली असली, तरी तिने दाखवलेली जिद्द ही अभिमानास्पद व कौतुकास्पद असल्याचे सांगत… Continue reading आ. ऋतुराज पाटील यांच्याकडून ऐश्वर्या जाधवचे कौतुक

राज्य कुराश स्पर्धेसाठी सोमवारी निवड चाचणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येत्या दि. १६ व १७ जुलै रोजी जळगाव येथे होणाऱ्या ज्युनियर व कॅडेट राज्यस्तरीय कुराश स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघ निवड चाचणी सोमवार, दि. ११ जुलै रोजी सकाळी १० वाजता पॅव्हेलियन मैदान कसबा बावडा येथील बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे. जिल्ह्यातील कुराश क्लब व खेळाडूंनी निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन कुराश असोसिएशनचे विभागीय… Continue reading राज्य कुराश स्पर्धेसाठी सोमवारी निवड चाचणी

मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले, इंग्लंडचा शानदार विजय

बर्मिंगहॅम : (वृत्तसंस्था) १५  वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले. बर्मिंगहॅम कसोटीत इंग्लंडने भारताचा सात गडी राखून पराभव केला. इंग्लंडच्या फलंदाजांनी आपल्या दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करत शानदार विजय मिळवला. इंग्लंडच्या वतीने हा आतापर्यंतचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग ठरला. उत्कृष्ट फॉर्मात असलेल्या जो रूट (नाबाद १४२) आणि जॉनी बेअरस्टो (नाबाद ११४ ) यांच्यातील… Continue reading मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले, इंग्लंडचा शानदार विजय

जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय, नेहरू युवा केंद्र-पंतजली योगपीठ, कोल्हापूरच्या यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला. आज सकाळी आयुष मंत्रालयाचा कॉमन योगा, जिल्हा क्रीडा… Continue reading जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा…

error: Content is protected !!