कोल्हापूर (प्रतिनिधी) : केएसएच्या टेबल टेनिस प्रशिक्षण वर्गातील खेळाडू वीरेन अभिजित पाटील याची जॉर्डन येथील अमान येथे दि.२४ ते २८ ऑगस्ट अखेर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या स्पर्धेत वीरेन हा भारताकडून ११ व १३ वयोगटात खेळणार आहे. वीरेन हा गेल्या चार वर्षांपासून केएसएचे प्रशिक्षक संग्राम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. त्याची स्पोर्टस्‌ अथॅरिटी ऑफ इंडिया खेलो इंडिया अंतर्गत न्यू दिल्ली येथील टी.टी.एफ.अकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. देशातील विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये वीरेनने उत्कृष्ट कामगिरी करत ११ व १३ वयोगटात तिसऱ्या क्रमांकाचे मानांकन मिळवून कोल्हापूरचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकवले आहे. या वयोगटात खेळणारा वीरेन हा कोल्हापूरचा पहिलाच खेळाडू आहे.

वीरेन यास संस्थेचे पेट्रन-इन-चीफ शाहू छत्रपती महाराज, माजी खा. संभाजीराजे छत्रपती, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती व मधुरिमाराजे छत्रपती, सचिव माणिक मंडलिक, ऑन. टेबल टेनिस सचिव नितीन जाधव यांचे प्रोत्साहन लाभले.