मुंबई (प्रतिनिधी) : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे ह्या आधी माझ्या पक्षात होत्या तसेच अंधारे या टीका करण्यात ‘एक्सपर्ट’ आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली. 

‘सुषमा अंधारे या टीका करण्यात एक्सपर्ट आहेत, टीका करायला हरकत नाही, पण सारखी टीका करू नये’ अंधारे आमच्याही पक्षात होत्या; पण आता त्या शिवसेनेत गेल्या आहेत. त्या तशा संघर्षशील वक्त्या आहेत. सध्या शिवसेनेत नेत्यांची कमी आहे. त्यामुळे त्यांना उपनेतेपद दिले आहे” असे  रामदास आठवले म्हणाले.