आमच्यामुळे ‘ते’ घराबाहेर पडले : चंद्रकांत पाटील

सांगली (प्रतिनिधी) : आम्ही मागे लागल्यानेच मुख्यमंत्री अखेर घरातून बाहेर पडले. घरात बसून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देता येत नाही. त्यासाठी बांधावर जावे लागते, असा उपरोधिक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज (रविवार) लगावला. ते सांगली येथे आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. चंद्रकांतदादा म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी… Continue reading आमच्यामुळे ‘ते’ घराबाहेर पडले : चंद्रकांत पाटील

‘त्या’ पत्रामुळे शिवसेना-भाजपाचे संबंध ताणले : अमित शहा

मुंबई (प्रतिनिधी) : मंदिरं, रामलीला, मदरसे यावरून भाजपनं सध्या ठाकरे सरकारविरुद्ध अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचे प्रयत्न भाजपकडून सातत्यानं सुरू आहेत. त्यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून सेक्युलर शब्दावरून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील संबंध ताणले गेले आहेत. या संबंधांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भाष्य केले.… Continue reading ‘त्या’ पत्रामुळे शिवसेना-भाजपाचे संबंध ताणले : अमित शहा

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना लोकप्रतिनिधी जबाबदार : संभाजीराजे छत्रपती

उस्मानाबाद (प्रतिनिधी) : राज्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारने ठोस मदत द्यावी. अन्यथा शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्यास त्याला लोकप्रतिनिधी जबाबदार असतील असे म्हणत खासदार संभाजीराजे छत्रपतींनी सरकार तसेच लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला. छत्रपती संभाजीराजे वेगवेगळ्या भागांना भेटी देत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी गावाला त्यांनी भेट दिली. गावातील विहिरींचे कठडे तुटले आहेत. तसेच… Continue reading शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना लोकप्रतिनिधी जबाबदार : संभाजीराजे छत्रपती

आरक्षणासाठी गरज पडल्यास घटनेत बदल करू : संभाजीराजे छत्रपती

पंढरपूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने समाजात असंतोष निर्माण झाला आहे. आरक्षणाचा विषय हा मुख्यत्वे राज्य सरकारचा आहे. मात्र यामध्ये केंद्र सरकारची मदत घेऊन गरज असेल तर घटना देखील बदलण्याचा अभ्यास करू, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. लवकरच राज्यातील सर्व पक्षीय खासदारांना घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे… Continue reading आरक्षणासाठी गरज पडल्यास घटनेत बदल करू : संभाजीराजे छत्रपती

प्रहार जनशक्ती पक्ष महिला आघाडी, युवक कार्यकारिणी जाहीर…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रतील सर्वसामान्य लोकांचे लाडके राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन कोल्हापूर जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्ष महिला आघाडी पक्षामध्ये काही महिला, युवक-युवतीनी प्रवेश केला. यामुळे महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रहार बळकट होत असल्याचे मत जिल्हाध्यक्ष जयराज कोळी यांनी व्यक्त केले. यावेळी जयराज कोळी यांनी, राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू नाव किंवा व्यक्ती नसून चांगल्या विचाराचे… Continue reading प्रहार जनशक्ती पक्ष महिला आघाडी, युवक कार्यकारिणी जाहीर…

शौचालय घोटाळ्याची चौकशी व्हावी : प्रविण जनगोंडा (व्हिडिओ)

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले पंचायत समितीमध्ये कोविड महामारीच्या काळात संपूर्ण स्वच्छता आणि हागणदारी मुक्तीच्या विशेष मोहीमेतून पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी सुमारे दोन कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला आहे. याची सखोल चौकशी होऊन दोषीवर कडक कारवाईची मागणी पंचायत समिती सदस्य प्रविण जनगोंडा यांच्यासह दलित महासंघ आणि बहुजन रयत परिषदेने केली आहे.

शिवसेनेचा यंदाचा दसरा महोत्सव ‘ऑनलाईन’…

मुंबई (प्रतिनिधी) : येत्या २५ ऑक्टोबरला होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा रद्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दसरा मेळावा ऑनलाईन होणार आहे. दरवर्षी शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्याला हजारो शिवसैनिक उपस्थित असतात. मात्र, कोरोनामुळं यंदा दसरा मेळावा होणार नाही, असे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन होणार आहे.… Continue reading शिवसेनेचा यंदाचा दसरा महोत्सव ‘ऑनलाईन’…

सावर्डे दुमालाच्या उपसरपंचपदी शालाबाई निकम…

म्हालसवडे (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यांतील सावर्डे दुमाला ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शालाबाई पांडुरंग निकम यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंच संतोषकुमार पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुवर्णा कारंडे होत्या. निकम यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. मंडल अधिकारी मदन सूर्यवंशी, तलाठी पांडुरंग धोत्रे यांच्या… Continue reading सावर्डे दुमालाच्या उपसरपंचपदी शालाबाई निकम…

राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा : राजू शेट्टी (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा फटका महाराष्ट्राला बसला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर शेतींचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे सर्वस्व पाण्यात गेले आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने तात्काळ राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्याला भरीव नुकसान भरपाई द्वावी, अशी मागणी माजी खा. राजू शेट्टी यांनी केली आहे.

२ नोव्हेंबरला ‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद : राजू शेट्टी (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १९ वी ऊस परिषद २ नोव्हेंबरला जयसिंगपूरमध्ये होणार आहे. स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या शिरोळ येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत परिषदेची तारीख निश्चित करण्यात आली. यामुळे कोरोनामुळे यंदा ऊस परिषद होणार की नाही, यासंबंधी निर्माण झालेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. प्रत्येक वर्षी ऊस परिषदेत हंगामातील उसाचा दर निश्चित… Continue reading २ नोव्हेंबरला ‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद : राजू शेट्टी (व्हिडिओ)

error: Content is protected !!