म्हालसवडे (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यांतील सावर्डे दुमाला ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शालाबाई पांडुरंग निकम यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंच संतोषकुमार पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुवर्णा कारंडे होत्या. निकम यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
मंडल अधिकारी मदन सूर्यवंशी, तलाठी पांडुरंग धोत्रे यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. सर्व सदस्यांच्या सहकार्याने गावातील विकासकामे पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू, असे नुतन उपसरपंच निकम यांनी सांगितले.
यावेळी माजी सरपंच कुंडलिक कारंडे, ग्रामसेवक शिवाजी वाडकर, दत्तात्रय निकम, पंढरीनाथ मोहिते, कृष्णात पाडळकर, ग्रामस्थ उपस्थित होते.