हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले पंचायत समितीमध्ये कोविड महामारीच्या काळात संपूर्ण स्वच्छता आणि हागणदारी मुक्तीच्या विशेष मोहीमेतून पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी सुमारे दोन कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला आहे. याची सखोल चौकशी होऊन दोषीवर कडक कारवाईची मागणी पंचायत समिती सदस्य प्रविण जनगोंडा यांच्यासह दलित महासंघ आणि बहुजन रयत परिषदेने केली आहे.