कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रतील सर्वसामान्य लोकांचे लाडके राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन कोल्हापूर जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्ष महिला आघाडी पक्षामध्ये काही महिला, युवक-युवतीनी प्रवेश केला. यामुळे महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रहार बळकट होत असल्याचे मत जिल्हाध्यक्ष जयराज कोळी यांनी व्यक्त केले.
यावेळी जयराज कोळी यांनी, राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू नाव किंवा व्यक्ती नसून चांगल्या विचाराचे मंथन आहे. प्रामाणिक सक्षम समर्थ तरुणच देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतात. समाजसेवेचा धागा पकडून राजकारण येऊन चांगलं समाजकार्य करत देशसेवा केली पाहिजे. भविष्यात कोल्हापूर जिल्ह्यात तरुणांचा प्रहारमध्ये वाढता आलेख पाहता नक्कीच बळकट होईल असे विश्वास व्यक्त केला.
यावेळी गीता हसुरकर यांची कोल्हापूर शहर उपाध्यक्ष पदी, शर्वरी माणगावे यांची कोल्हापूर शहर युवती कार्याध्यक्ष पदी, अश्विनी पाटील यांची पन्हाळा तालुका युवती अध्यक्ष पदी, माधुरी म्हेत्रे यांची कोल्हापूर शहर युवती सचिव पदी, प्रकाश किरवेकर यांची गगनबावडा तालुका उपाध्यक्ष पदी, दत्तात्रय कोळी यांची हातकणंगले तालुका युवक सचिव पदी, तर अभय शिंदे यांची हातकणंगले तालुका युवक कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांच्या नियुक्तीचे पत्र जिल्हाध्यक्ष जयराज कोळी आणि जिल्हा उपाध्यक्ष दगडू माने यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.