महापालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचाली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिका निवडणूक डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये होण्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे सर्वच प्रमुख पक्षांमध्ये राजकीय हालचाली सुरू झाल्या आहे. भाजप आणि काँग्रेस पक्षातर्फे शहरातील सर्व प्रभागात उमेदवार देण्याच्या दृष्टीने तयारी करीत आहेत. पुन्हा निवडणूक लढविण्याची इच्छा असणारे आणि नवे इच्छुक असलेले प्रभागातील तरुण मंडळांशी संपर्क वाढवला आहे. महापालिकेवर सध्या काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता आहे.… Continue reading महापालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचाली

राज्यपालपदावर राहायचे की नाही, हे ‘त्यांनी’ ठरवावे : शरद पवार

उस्मानाबाद (प्रतिनिधी) : राज्यपाल हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांना  या पदाची प्रतिष्ठा राखता आली पाहिजे. त्यांनी मुख्यमंत्रिपदाचीही प्रतिष्ठा राखायला हवी. कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात जी भाषा वापरली याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नाराजी व्यक्त केलीय. त्यामुळे राज्यपालपदावर आता त्यांना राहायचे की नाही, हा त्यांचा निर्णय आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद… Continue reading राज्यपालपदावर राहायचे की नाही, हे ‘त्यांनी’ ठरवावे : शरद पवार

भटक्या-विमुक्त जातीजमाती तालुकाध्यक्ष पदी विठ्ठल मलगुंडे…

धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या-विमुक्त जाती जमातीच्या तालुकाध्यक्ष पदी म्हासुर्ली पैकी बाजारीचा धनगर वाडा येथील विठ्ठल सोनबा मलगुंडे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. सोळांकुर येथील यशवंत माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील होते.   ए. वाय. पाटील म्हणाले,  मलगुंडे यांनी या अगोदर राधानगरी तालुका धनगर समाज क्रांतिकारक… Continue reading भटक्या-विमुक्त जातीजमाती तालुकाध्यक्ष पदी विठ्ठल मलगुंडे…

सारथीच्या मागण्या विषयी उपमुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक : हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या ९ महिन्यात सारथीचे कामकाज ठप्प असल्याने स्वायतत्ता पूर्ववत ठेवावी या आणि इतर मागण्यांसाठी आंदोलने केली होती. नुकत्याच श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक बैठकीत पुणे येथे लालमहालावर आंदोलन जाहीर केले होते याची दखल घेऊन शासनाने सारथीला स्वायतत्ता देण्याचा आदेश दिल्याबद्दल नाम. मुश्रीफ यांचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी सारथीसह मराठा… Continue reading सारथीच्या मागण्या विषयी उपमुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक : हसन मुश्रीफ

आमच्यामुळे ‘ते’ घराबाहेर पडले : चंद्रकांत पाटील

सांगली (प्रतिनिधी) : आम्ही मागे लागल्यानेच मुख्यमंत्री अखेर घरातून बाहेर पडले. घरात बसून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देता येत नाही. त्यासाठी बांधावर जावे लागते, असा उपरोधिक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज (रविवार) लगावला. ते सांगली येथे आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. चंद्रकांतदादा म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी… Continue reading आमच्यामुळे ‘ते’ घराबाहेर पडले : चंद्रकांत पाटील

‘त्या’ पत्रामुळे शिवसेना-भाजपाचे संबंध ताणले : अमित शहा

मुंबई (प्रतिनिधी) : मंदिरं, रामलीला, मदरसे यावरून भाजपनं सध्या ठाकरे सरकारविरुद्ध अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचे प्रयत्न भाजपकडून सातत्यानं सुरू आहेत. त्यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून सेक्युलर शब्दावरून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील संबंध ताणले गेले आहेत. या संबंधांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भाष्य केले.… Continue reading ‘त्या’ पत्रामुळे शिवसेना-भाजपाचे संबंध ताणले : अमित शहा

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना लोकप्रतिनिधी जबाबदार : संभाजीराजे छत्रपती

उस्मानाबाद (प्रतिनिधी) : राज्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारने ठोस मदत द्यावी. अन्यथा शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्यास त्याला लोकप्रतिनिधी जबाबदार असतील असे म्हणत खासदार संभाजीराजे छत्रपतींनी सरकार तसेच लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला. छत्रपती संभाजीराजे वेगवेगळ्या भागांना भेटी देत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी गावाला त्यांनी भेट दिली. गावातील विहिरींचे कठडे तुटले आहेत. तसेच… Continue reading शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना लोकप्रतिनिधी जबाबदार : संभाजीराजे छत्रपती

आरक्षणासाठी गरज पडल्यास घटनेत बदल करू : संभाजीराजे छत्रपती

पंढरपूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने समाजात असंतोष निर्माण झाला आहे. आरक्षणाचा विषय हा मुख्यत्वे राज्य सरकारचा आहे. मात्र यामध्ये केंद्र सरकारची मदत घेऊन गरज असेल तर घटना देखील बदलण्याचा अभ्यास करू, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. लवकरच राज्यातील सर्व पक्षीय खासदारांना घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे… Continue reading आरक्षणासाठी गरज पडल्यास घटनेत बदल करू : संभाजीराजे छत्रपती

प्रहार जनशक्ती पक्ष महिला आघाडी, युवक कार्यकारिणी जाहीर…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रतील सर्वसामान्य लोकांचे लाडके राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन कोल्हापूर जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्ष महिला आघाडी पक्षामध्ये काही महिला, युवक-युवतीनी प्रवेश केला. यामुळे महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रहार बळकट होत असल्याचे मत जिल्हाध्यक्ष जयराज कोळी यांनी व्यक्त केले. यावेळी जयराज कोळी यांनी, राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू नाव किंवा व्यक्ती नसून चांगल्या विचाराचे… Continue reading प्रहार जनशक्ती पक्ष महिला आघाडी, युवक कार्यकारिणी जाहीर…

शौचालय घोटाळ्याची चौकशी व्हावी : प्रविण जनगोंडा (व्हिडिओ)

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले पंचायत समितीमध्ये कोविड महामारीच्या काळात संपूर्ण स्वच्छता आणि हागणदारी मुक्तीच्या विशेष मोहीमेतून पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी सुमारे दोन कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला आहे. याची सखोल चौकशी होऊन दोषीवर कडक कारवाईची मागणी पंचायत समिती सदस्य प्रविण जनगोंडा यांच्यासह दलित महासंघ आणि बहुजन रयत परिषदेने केली आहे.

error: Content is protected !!