सम्राटनगर येथील अतिक्रमणे हटवा अन्यथा..! : ‘आप’चा इशारा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सम्राटनगर येथील नाल्यात अनधिकृत बांधकामांमुळे येथील नागरिकांच्या घरात दरवर्षी पाणी शिरते. याची  तक्रार महापालिकेकडे वर्षभरापासून प्रलंबित आहे. महापालिकेचे उप नगररचनाकार रमेश मस्कर यांनी जागेवर भेट देऊन संबंधित अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस बजावली होती. त्याला दोन आठवडे उलटूनही अतिक्रमण काढण्याची कार्यवाही झाली नाही. त्यामुळे हे अतिक्रमण काढले नाही तर सर्व नागरीक नगररचना कार्यालयात… Continue reading सम्राटनगर येथील अतिक्रमणे हटवा अन्यथा..! : ‘आप’चा इशारा

प्रामाणिक शेतकऱ्यांचा उद्रेक झाला तर तुम्हाला घराबाहेर फिरणे अवघड होईल : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : राज्य सरकारकडे आश्वासनांची खैरात करण्यासाठी पैसे आहेत. ‘गरीब’ मंत्र्यांना गाडी घेण्यासाठी बिनव्याजी कर्ज देण्यासाठी पैसे आहेत, मंत्र्यांची मुंबईतील निवासस्थानाची थकलेली बिले भरण्यास पैसे आहेत, परंतु या सरकारला आज दीड वर्ष झाले तरी प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेले ५० हजारांचे अनुदान देण्यासाठी पैसे नाहीत. आगामी अधिवेशनात हा विषय घेऊन शासनाने हे अनुदान… Continue reading प्रामाणिक शेतकऱ्यांचा उद्रेक झाला तर तुम्हाला घराबाहेर फिरणे अवघड होईल : समरजितसिंह घाटगे

राधानगरीची भूमी उद्या गोमूत्र शिंपडून पवित्र करणार : राष्ट्रवादीचा इशारा

मुरगुड (प्रतिनिधी) : छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिवशी राधानगरीची भूमी कलंकित करू नये, अशी विनंती आम्ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशजांना केली होती. परंतु, आमची ही विनंती धुडकावत त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिवशीच ती पवित्र भूमी कलंकित केली. ती पुन्हा पवित्र करण्यासाठी उद्या (मंगळवार)  त्याठिकाणी आम्ही गोमूत्र शिंपडून त्यांनी कलंकित केलेली ही भूमी… Continue reading राधानगरीची भूमी उद्या गोमूत्र शिंपडून पवित्र करणार : राष्ट्रवादीचा इशारा

कोल्हापूर जिल्हा परिषदेत पदाधिकारी खांदेपालटाच्या हालचालीला वेग…

वारणानगर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्याचे मिनीमंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेत उद्या (सोमवार) खांदेपालट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. उद्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची तारीख जाहीर होणार असल्याने आता पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आ. डॉ .विनय कोरे यांना जिल्हा परिषदेमध्ये घेण्याचे जोरदार प्रयत्न केले जात आहे. काही… Continue reading कोल्हापूर जिल्हा परिषदेत पदाधिकारी खांदेपालटाच्या हालचालीला वेग…

‘हे’ सरकार पाचवर्षे टिकेल : शरद पवार

मुंबई (प्रतिनिधी) :  कुठल्याही महत्वाच्या धोरणात्मक प्रश्नासाठी सहकारी एकत्र बसतात आणि त्यावर निर्णय घेत असतात. त्यामुळं हे सरकार अत्यंत व्यवस्थित चाललं आहे. त्यातूनच हे सरकार पाच वर्षे टिकेल याबद्दल शंका नसल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले. शरद पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार व्यवस्थित चालले आहे. राजकीय पक्षाला संघटनात्मक शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणे हे… Continue reading ‘हे’ सरकार पाचवर्षे टिकेल : शरद पवार

‘हेरले’साठी तुम्ही हाक द्या मी साथ देतो : राजेंद्र पाटील-यड्रावकर 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हेरले गावासाठी तुम्ही हाक द्या, मी साथ देतो अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी हेरले ग्रामस्थांना दिली. ते राजर्षी शाहू जयंती निमित्त हेरले येथील लिम्रास चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या शिबिरात १८२ युवकांनी रक्तदान केले. हेरले येथील लिम्रास चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष इकबाल देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले.… Continue reading ‘हेरले’साठी तुम्ही हाक द्या मी साथ देतो : राजेंद्र पाटील-यड्रावकर 

शिरोली येथे भाजपाचे चक्का जाम आंदोलन…

हातकणंगले / टोप (प्रतिनिधी) :  ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत ठेवावे, या मागणीसाठी भाजपातर्फे हातकणंगले तालुकाध्यक्ष राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोली येथे आज (शनिवार) चक्का जाम आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या निषेधार्थ  घोषणाबाजी केली. यावेळी जिल्हा किसान मोर्चाचे उपाध्यक्ष सतिश पाटील, तालुका सरचिटणीस भूपाल कांबळे, ऋषिकेश सरनोबत, धनाजी लोहार, शिवाजी पाटील, सौरभ पाटील, कृष्णात पाटील, विश्वास… Continue reading शिरोली येथे भाजपाचे चक्का जाम आंदोलन…

दुधाला आधारभूत किंमत देणारा कायदा करणार : ना. सुनील केदार

मुंबई (प्रतिनिधी) :  दुधाला कायमस्वरुपी चांगला दर मिळावा यासाठी राज्य सरकार दुधाला किमान आधारभूत किंमत देणारा (एफआरपी) कायदा करणार आहे. हा कायदा खाजगी आणि सहकारी दूध संघांना लागू राहील. दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात दुधाच्या दराबाबत आज (शुक्रवार) बैठक पार पडली. दुधाला एफआरपी देणारा कायदा तातडीने केला जाईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री सुनील… Continue reading दुधाला आधारभूत किंमत देणारा कायदा करणार : ना. सुनील केदार

भुदरगड पंचायत समितीच्या उपसभापती पदी अजित देसाई बिनविरोध…

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड पंचायत समितीच्या उपसभापती पदी अजित देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीसाठी भुदरगड पंचायत समिती येथे विषेश सभा घेण्यात आली होती. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अश्निनी आडसूळ यांनी ही निवड़ जाहीर केली. यावेळी जि.प.कोल्हापूरचे माजी उपाध्यक्ष बी.एस.देसाई, गोकूळ संचालक नंदकुमार ढेंगे, राहूरी कृषि विद्यापीठ संचालक दत्तात्रय उगले, बाजार… Continue reading भुदरगड पंचायत समितीच्या उपसभापती पदी अजित देसाई बिनविरोध…

कोल्हापूरच्या अस्मितेला कोणीही डिवचण्याचा प्रयत्न करु नये : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांनी आजपर्यंत आम्ही शिवसैनिक काम करीत आलो आहोत. छ. शाहू महाराजांनी आपला स्वाभिमान अखंड जगाला दाखविला. कोणी उद्योगपती कोल्हापूरच्या स्वाभिमानाला डिवचून प्रवेशद्वारावरच जाहिरातीचा फलक लावत असेल, तर शिवसेना कदापी खपवून घेणार नाही, असा इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिला.     गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर शहराच्या… Continue reading कोल्हापूरच्या अस्मितेला कोणीही डिवचण्याचा प्रयत्न करु नये : राजेश क्षीरसागर

error: Content is protected !!