मराठा समाजाच्या आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी प्रांतांना निवेदन

काेल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून गेले ३० वर्ष मराठा समाज मागणी करत आहे. मात्र, काही विघ्नसंतोषी लोकांमुळे आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. ही स्थगिती उठवून मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे, या मागणीचे निवेदन सकल मराठा समाज पन्हाळा तालुका यांच्या वतीने प्रांतअधिकारी अमित माळी व पन्हाळ्याचे तहसिलदार रमेश शेंडगे यांना दिले आहे. दिलेल्या… Continue reading मराठा समाजाच्या आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी प्रांतांना निवेदन

शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य संपवणारे हे विधेयक ! : राजू शेट्टी (व्हिडिओ)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आज सुधारित कृषी विधेयकांची होळी करण्यात आली. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी विधेयकावरून यांनी केंद्र सरकारवर टीका केली.  

माजी विद्यार्थ्यांकडून महानगरपालिकेस ४०० बॉडी कव्हर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील सेंन्ट झेवियर हायस्कूलमधील १९९५ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी महानगरपालिकेकडे ४०० बॉडी कव्हर महापौर निलोफर आजरेकर यांच्याकडे सुपुर्द केले. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी, गटनेते अजित ठाणेकर, नगरसचिव सुनील बिद्रे, गौतम पिसे, अशिष तुरककीया, अनंत सागर, लोहित डिसोझा, अशितोष अकोलकर आदी उपस्थित होते.

 महापालिकेत पंडीत दिनदयाल उपाध्याय यांना अभिवादन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेत पंडीत दिनदयाल उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.   महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात महापौर निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी, गटनेता अजित ठाणेकर व कर्मचारी उपस्थित होते.

विद्यापीठ हायस्कूलच्या १९८२-८३ बॅचकडून एक ट्रक लाकूड दान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भक्ती सेवा विद्यापीठ हायस्कूल कोल्हापुरच्या १९८२-८३ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक भावनेतून १७ टन लाकुड पंचगंगा स्मशानभुमीस दान केले. कोविड १९ मुळे महानगरपालिकेच्या व्यवस्थेवर आर्थिक ताण पडत आहे. याचा विचार करत अनेक सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती वस्तू स्वरुपात मदत करत आहे. यामुळे गेल्या २५ ते ३० दिवसात पंचगंगा स्मशानभूमीस मोठया प्रमाणावर शेणी दान… Continue reading विद्यापीठ हायस्कूलच्या १९८२-८३ बॅचकडून एक ट्रक लाकूड दान

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ६२७ जण कोरोनाबाधित : ६३७ जण कोरोनामुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (गुरुवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात तब्बल ६२७ जण कोरोनाबाधित सापडले आहेत. तर १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ६३७ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १५०७  जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज रात्री ९.३० वा. प्राप्त झालेल्या… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ६२७ जण कोरोनाबाधित : ६३७ जण कोरोनामुक्त

नेहरूनगर प्रभागात सॅनिटायझर, मास्कचे वाटप : सौ. अश्विनी बारामते

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना संसर्गच्या काळात नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावं यासाठी राज्य शासनाने माझं कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत सर्वत्र मोहीम राबविण्यात आलेली आहे. त्याच पध्दतीने महानगरपालिकेचे आरोग्य विभागकडील कर्मचारी काम करत आहेत. महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 59 च्या नगरसेविका सौ. अश्विनी बारामते यांच्यामार्फत नेहरू नगर प्रभागामधील आरोग्य सेवक, झाडू कामगार व प्रभागातील प्रत्येक घरात सॅनिटीझर बाटली स्कचे… Continue reading नेहरूनगर प्रभागात सॅनिटायझर, मास्कचे वाटप : सौ. अश्विनी बारामते

आयसोलेशन हॉस्पिटलला जनरेटर देणार : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांचे नातू राजकुमार यशराजराजे छत्रपतीं यांच्या वाढदिवसानिमित्त आयसोलेशन येथे नव्याने स्थापन केलेल्या कोव्हीड केअर सेंटरसाठी 5 लाखांचा जनरेटर देण्याचे जाहिर केले. न्यू पॅलेस इथे माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी त्यांचे चिरंजीव राजकुमार यशराजराजे छत्रपती यांचा वाढदिवस साजरा न करता त्यांनी… Continue reading आयसोलेशन हॉस्पिटलला जनरेटर देणार : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज

सोमवारी गारगोटी इथे मराठा आरक्षण बचाव संघर्ष समितीचे रास्तारोको

गारगोटी (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देण्यास स्थगिती दिल्यानंतर समाजात तीव्र असंतोष पसरला आहे. भुदरगड तालुक्यातील गावागावातून आंदोलन होत आहे. त्यातच राज्य शासन नोकरभरती करत असून ती थांबवावी या मागणीसाठी तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने (दि.२८) सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता गारगोटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच मराठा आरक्षण बचाव संघर्ष… Continue reading सोमवारी गारगोटी इथे मराठा आरक्षण बचाव संघर्ष समितीचे रास्तारोको

कळेमध्ये आई, दोन मुलांच्या पाठोपाठ वडिलांचाही सहाव्या दिवशी मृत्यू

कळे (प्रतिनिधी) : कळे येथील प्रसिद्ध व्यावसायिक कुटूंबातील दि. १९ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी आई आणि दोन मुलांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. नतंर याच कुटूंबातील वडिलांचा आज (गुरुवार) सहाव्या दिवशी कोरोनाच्या उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने पन्हाळा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. कोरोनामुळे एकाच कुटूंबातील तिघांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने पन्हाळा तालुक्यासह जिल्हा हादरला होता. याच… Continue reading कळेमध्ये आई, दोन मुलांच्या पाठोपाठ वडिलांचाही सहाव्या दिवशी मृत्यू

error: Content is protected !!