कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेत पंडीत दिनदयाल उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.  

महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात महापौर निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी, गटनेता अजित ठाणेकर व कर्मचारी उपस्थित होते.