कोल्हापूर (प्रतिनिधी) : भक्ती सेवा विद्यापीठ हायस्कूल कोल्हापुरच्या १९८२-८३ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक भावनेतून १७ टन लाकुड पंचगंगा स्मशानभुमीस दान केले.
कोविड १९ मुळे महानगरपालिकेच्या व्यवस्थेवर आर्थिक ताण पडत आहे. याचा विचार करत अनेक सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती वस्तू स्वरुपात मदत करत आहे. यामुळे गेल्या २५ ते ३० दिवसात पंचगंगा स्मशानभूमीस मोठया प्रमाणावर शेणी दान व अन्य वस्तू दान करत आहेत. भक्ती सेवा विद्यापीठ हायस्कूल कोल्हापुरच्या १९८२-८३ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी १७ टन लाकुड पंचगंगा स्मशानभुमीस दान केले.
यावेळी विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, आरोग्य निरीक्षक महेश भोसले तसेच शाळेचे माजी विद्यार्थी संजय मोरे, राम काटकर, वसंत दुखंडे, नंदन कुलकर्णी, सागर तळाशीकर, संजय रणदिवे, महेंद्र ओसवाल, प्रसन्ना पोमन्नावर, मानसिंग जाधव, उमेश कोकणे, रवि शिंदे, अजय साबळे उपस्थित होते. माजी विद्यार्थी उमेश शिंदे व लाकुड व्यावसायिक अमीन मुल्ला यांचे विशेष सहकार्य लाभले.