‘प्रवीण मसाले’चे निर्माते हुकमीचंद चोरडिया यांचे निधन…

पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ उद्योजक हुकमीचंद सुखलाल चोरडिया यांचे आज (शुक्रवार) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. प्रवीण मसालेवाले या सुप्रसिद्ध ब्रँडचे ते संस्थापक होते. प्रवीण मसाले या मसाल्याच्या कंपनीची स्थापना त्यांनी १९६२ मध्ये केली होती. प्रवीण मसालेवाले हा ब्रँड घरोघरी पोहोचवण्यासाठी हुकमीचंद चोरडियांनी ४० ते ५० वर्ष अविरत कष्ट… Continue reading ‘प्रवीण मसाले’चे निर्माते हुकमीचंद चोरडिया यांचे निधन…

पाणंद रस्त्यासाठी शिरोळ तालुक्यासाठी २५ कोटी : राज्यमंत्री यड्रावकर

शिरोळ (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मातोश्री ग्रामसमृद्धी योजनेच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यासाठी १०५ किलोमीटर लांबीच्या शेत पाणंद रस्त्यांसाठी २५ कोटीचा निधी शासनाने मंजूर केला आहे. या निधीअंतर्गत होणाऱ्या कामांना नियोजन विभागाकडून २०२२-२०२३ च्या आराखड्यास मान्यता मिळाली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. शिरोळ तालुक्यात मंजूर निधीमधून निश्चित केलेली कामे लवकरच सुरू… Continue reading पाणंद रस्त्यासाठी शिरोळ तालुक्यासाठी २५ कोटी : राज्यमंत्री यड्रावकर

कुंभोजमध्ये पुरस्कार प्राप्त युवकांचा सत्कार…

कुंभोज (प्रतिनिधी) : कुंभोज गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या युवकांचा सत्कार वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संजय कुरणे, समीर भोकरे, ग्रा. पं. सदस्य अजित देवमोरे, अविनाश चव्हाण यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अपंग खेळाडू अविनाश चव्हाण याला प्रा. संजय कदम… Continue reading कुंभोजमध्ये पुरस्कार प्राप्त युवकांचा सत्कार…

राज्यसभेचा घोडेबाजार आणि महाडिकांचा संघर्ष..

कोल्हापूर(प्रतिनिधी)  : राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत घोडेबाजाराची चर्चा रंगू लागली असतानाच सत्ताधारी महाविकास आघाडी अंतर्गत धुसफूस सुरु असल्याचे दिसून येत आहे. खुद्द शिवसेनेतील लोकप्रतिनिधी नाराज असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्प्ष्ट होत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या नाराजीचा फायदा कोणाला मिळतो किंवा कोण उठवणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे. नाराज सत्ताधारी लोकप्रतिनिधींना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप… Continue reading राज्यसभेचा घोडेबाजार आणि महाडिकांचा संघर्ष..

खासदारकीच्या बदल्यात विधान परिषदेची आमदारकी हा प्रस्ताव ‘कोण’ स्वीकारणार ?

कोल्हापूर (प्रतिनिधी) : खासदारकीच्या बदल्यात विधान परिषदेची आमदारकी देऊ त्याबदल्यात राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करा असा प्रस्ताव महाविकास आघाडी‌ कडून देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील हीच ऑफर महाविकास आघाडीच्या समोर ठेवली आहे की भाजपा विधान विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीला  एक जागा सोडेल त्यामुळे महाविकास आघाडीने निवडणुकीतून माघार घ्यावी असा प्रस्ताव… Continue reading खासदारकीच्या बदल्यात विधान परिषदेची आमदारकी हा प्रस्ताव ‘कोण’ स्वीकारणार ?

बारावीचा निकाल पुढील आठवड्यात : वर्षा गायकवाड

शिर्डी (प्रतिनिधी) : बारावीचा निकाल पुढच्या आठवड्यात तर पंधरा दिवसांनी म्हणजेच जूनच्या तिसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल लागेल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिर्डी येथे पत्रकार परिषदेत दिली. यंदा कोरोनानंतर दोन वर्षांनी पहिल्यांदाच दहावी-बारीवीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. दहावीची परीक्षा १५  मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत पार पडली. बारावीची लेखी परीक्षा ४… Continue reading बारावीचा निकाल पुढील आठवड्यात : वर्षा गायकवाड

संजय घोडावत अकॅडमीचे एमपीएसी स्पर्धा परीक्षेत यश…

हातकणंगले (प्रतिनिधी) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या एमपीएसी राज्यसेवा अंतिम परीक्षेतून कोल्हापूर जिल्ह्यातून सात विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. त्यामध्ये संजय घोडावत इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेसच्या चा विद्यार्थ्याची अंतिम यादीत निवड झाली आहे. यामध्ये अपर्णा यादव (रा. निगवे दुमाला, ता. करवीर) यांची नायब तहसीलदारपदी निवड झाली आहे.  ही ईडब्ल्यूएस महिला प्रवर्गातून राज्यात पहिली आली आहे. तर… Continue reading संजय घोडावत अकॅडमीचे एमपीएसी स्पर्धा परीक्षेत यश…

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपची ‘ही’ अट : पाचवी जागा लढवण्याची तयारी

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चौथा उमेदवार मागे घेतला नाही तर विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने पाचवी जागा लढवण्याची तयारी सुरु केली आहे. भाजपच्या या अटीमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेच्या १० रिक्त जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या १० जागांसाठी एका उमेदवाराला २७ मतांचा कोटा आहे. यानुसार भाजपचे… Continue reading विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपची ‘ही’ अट : पाचवी जागा लढवण्याची तयारी

पाटीदार नेता हार्दिक पटेलचा भाजपमध्ये प्रवेश : अनेक नेत्यांसह समर्थकही दाखल

अहमदाबाद (वृत्तसंस्था) :  गुजरातमधील पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. गांधीनगर येथील भाजप मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व बहाल केले आहे. यादरम्यान पाटीदार आंदोलनात त्यांचे सहकारी असलेले अनेक नेते आणि त्यांचे समर्थकही भाजपमध्ये दाखल झाले. पाटीदार नेता हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये नाराज होते. पक्षाचा राजीनामा… Continue reading पाटीदार नेता हार्दिक पटेलचा भाजपमध्ये प्रवेश : अनेक नेत्यांसह समर्थकही दाखल

जैन यांच्यापाठोपाठ सिसोदियांना अडकवण्याचा प्रयत्न : केजरीवालांचा दावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नुकतीच दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी अटक केली. जैन यांच्यानंतर आता केंद्र सरकार दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याच्या तयारीत आहेत. असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत केला. मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, मी काही महिन्यांपूर्वी सर्वांना सांगितले होते की, सत्येंद्र जैन… Continue reading जैन यांच्यापाठोपाठ सिसोदियांना अडकवण्याचा प्रयत्न : केजरीवालांचा दावा

error: Content is protected !!