धक्कादायक बातमी : सांगलीच्या उपजिल्हाधिकारी हर्षदा गेडाम यांच्यावर चाकूहल्ला

सांगली (प्रतिनिधी) :  सांगलीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. सांगलीच्या उपजिल्हाधिकारी महिला अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास जॉगिंगला गेलेल्या उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांच्यावर अज्ञाताने चाकू हल्ला केला. यामध्ये गेडाम यांच्या हाताला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षलता गेडाम या… Continue reading धक्कादायक बातमी : सांगलीच्या उपजिल्हाधिकारी हर्षदा गेडाम यांच्यावर चाकूहल्ला

स्वप्नवेल पॉईंटजवळ सापडला एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यातील कळसगादे गावानजीक असणाऱ्या स्वप्नवेल पॉईंटजवळ कॅनोलच्या ब्रिजखाली एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडल्याची माहिती चंदगड पोलिसांनी दिली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कळसगादे गावानजीक स्वप्नवेल पॉईंटकडे जाणाऱ्या कॅनॉलचे ब्रिजखाली एका अनोळखी पुरुषाचा  मृतदेह सापडला आहे. या मृताचे वय अंदाजे तीस ते पस्तीस वर्ष असण्याची शक्यता आहे. त्याच्या अंगात बारीक चेकचा फिकट… Continue reading स्वप्नवेल पॉईंटजवळ सापडला एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह…

शाहूपुरीतील शांतीगिरी अपार्टमेंटमध्ये चोरी : २ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल लंपास

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापुरातल्या शाहूपुरी सहावी गल्लीतील शांतीगिरी अपार्टमेंटमध्ये घराच्या दरवाजा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील तिजोरीतील २ लाख ६२ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. याप्रकरणी स्नेहलकुमार निशिकांत सरनाईक (रा. शांतीगिरी अपार्टमेंट, शाहुपुरी) यांनी फिर्याद दिली आहे. या अज्ञात चोरट्याविरोधात शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचखोर एजंटास एक वर्षाची साधी कैद…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : तक्रारदाराच्या घराचा बांधकाम परवाना देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी दोषी ठरलेला एजंट मिलिंद केरबा वावरे यास भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत जिल्हा न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी एक वर्षे साधी कैद आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा आज (मंगळवार) सुनावली. या खटल्यातील एक नंबरचा आरोपी व कोल्हापूर महापालिकेचा कनिष्ठ अभियंता मिलिंद जनार्दन पाटील… Continue reading लाचखोर एजंटास एक वर्षाची साधी कैद…

इस्लामपूर येथे ट्रकच्या चाकाखाली सापडून मुलाचा मृत्यू…

इस्लामपूर (प्रतिनिधी) : सायकलवरून घरी येत असलेल्या नऊ वर्षांच्या मुलाचा रासायनिक खतांची पोती भरून निघालेल्या ट्रकच्या चाकाखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. निरंजन सचिन पाटील (वय ९, रा. जाधव गल्ली, इस्लामपूर) असे मुलाचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. उरुण परिसरातील खेड रस्त्यावर निरंजन हा सायकलवरून घरी येत होता.… Continue reading इस्लामपूर येथे ट्रकच्या चाकाखाली सापडून मुलाचा मृत्यू…

नृसिंहवाडीत १० ब्रास वाळू जप्त : तहसिलदारांची कारवाई

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : नृसिंहवाडी दत्त मंदिरासमोर औरवाड पाणवठ्यावर मध्यरात्री बेसुमार वाळू चोरी तस्करांकडून केली जात होती. याबाबत तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांच्या आदेशानुसार मंडल अधिकारी, तलाठी यांच्या पथकाने कारवाई करीत १० ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. पर्यावरण विभागाने नदी पात्रातून वाळू उपशास बंदी घातली असताना देखील नृसिंहवाडी दत्त मंदिरासमोर औरवाड पाणवठ्यावर मध्यरात्री बेसुमार वाळू चोरी… Continue reading नृसिंहवाडीत १० ब्रास वाळू जप्त : तहसिलदारांची कारवाई

धनगरमोळा येथे विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू…

आजरा (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यातील धनगरमोळा येथे शेतातील झाडाच्या फांद्या तोडताना विद्युत प्रवाहित असलेल्या तारेवर फांदी पडून शॉक लागल्याने शंकर धाकू माडभगत (वय ३८) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. आजरा पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे.  शंकरच्या पाठोपाठ शेतात गेलेले त्यांचे वडील धाकू माडभगत यांच्या लक्षात… Continue reading धनगरमोळा येथे विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू…

अकिवाट येथे बंद घरात चोरी : १ लाख ८ हजारांचा मु्द्देमाल लंपास

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून शिरकाव केला. तर सोन्याचांदीच्या दागिन्यांसह ६० हजार रुपयांची रक्कम असा १ लाख ८ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याची फिर्याद विद्यानंद आदिनाथ दानोंळे (वय ४२, रा.अकिवाट) यांनी कुरुंदवाड पोलिसात दिली आहे. फिर्यादीमध्ये म्हटले  आहे की, अकिवाट येथील काळम्मावाडी रस्त्यावरील कागेवेस येथील दानोळे हे गावी… Continue reading अकिवाट येथे बंद घरात चोरी : १ लाख ८ हजारांचा मु्द्देमाल लंपास

पाळेमुळे खणून काढलेला ‘मटका’ जिल्ह्यात पुन्हा रुजतोय

कोल्हापूर (विजय पोवार) : मटका व्यवसायातून मिळालेल्या पैशातून आलेल्या मस्तीने दोन वर्षापूर्वी थेट खाकी वर्दीलाच हात घातला होता. ही मस्ती जिरवण्यासाठी तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील नव्हे, तर संपूर्ण राज्यातील मटका किंग गजाआड केले. पण आता कोल्हापूर जिल्ह्यात मटका व्यवसाय पुन्हा रुजायला लागला आहे. कोल्हापूर शहरात काही प्रमाणात तर ग्रामीण… Continue reading पाळेमुळे खणून काढलेला ‘मटका’ जिल्ह्यात पुन्हा रुजतोय

लाचप्रकरणातील पोलीस कॉन्स्टेबलला दोन दिवसांची पोलीस कोठडी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात तक्रारदाराकडून दाखल गुन्ह्याच्या तपासामध्ये मदत करण्यासाठी १० हजार लाचेची मागणी केल्याप्रकरणी एसीबीने मंगळवारी अटक केलेल्या लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलला आज (बुधवारी) न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. दिग्विजय पांडुरंग मर्दाने (वय ३५, नेमणूक लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे, रा. मु. पो. शिंगणापूर, ता. करवीर) असे कोठडी सुनावलेल्या कॉन्स्टेबलचे नांव आहे. कोल्हापुरातील नागाळा पार्क… Continue reading लाचप्रकरणातील पोलीस कॉन्स्टेबलला दोन दिवसांची पोलीस कोठडी

error: Content is protected !!