कोल्हापूर (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यातील कळसगादे गावानजीक असणाऱ्या स्वप्नवेल पॉईंटजवळ कॅनोलच्या ब्रिजखाली एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडल्याची माहिती चंदगड पोलिसांनी दिली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कळसगादे गावानजीक स्वप्नवेल पॉईंटकडे जाणाऱ्या कॅनॉलचे ब्रिजखाली एका अनोळखी पुरुषाचा  मृतदेह सापडला आहे. या मृताचे वय अंदाजे तीस ते पस्तीस वर्ष असण्याची शक्यता आहे. त्याच्या अंगात बारीक चेकचा फिकट चॉकलेटी रंगाचा टी शर्ट व काळे रंगाचे स्पोर्ट नाईट पॅन्ट, त्यावर इंग्रजीमध्ये स्पोर्ट आणि वन असे लिहिलेले आहे. तसेच चॉकलेटी रंगाची डीक्सी कंपनीची अंडरवेअर, उजव्या हाताच्या मनगटाचे पुढील बाजूस त्रिशूल डमरू, सापाचे चित्र असे गोंदलेले आहे.

हा मृतदेह कॅनॉलचे ब्रिजचे खालील बाजूस जंगलांमध्ये सडलेल्या अवस्थेत मिळून आल्याचे कळसगादेचे पोलीस पाटील सदानंद विठ्ठल सुतार यांनी चंदगड पोलिसांना सांगितले. त्यानुसार अधिक तपास चंदगड पोलीस करत आहेत.