कोल्हापूर (प्रतिनिधी) : तक्रारदाराच्या घराचा बांधकाम परवाना देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी दोषी ठरलेला एजंट मिलिंद केरबा वावरे यास भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत जिल्हा न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी एक वर्षे साधी कैद आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा आज (मंगळवार) सुनावली.

या खटल्यातील एक नंबरचा आरोपी व कोल्हापूर महापालिकेचा कनिष्ठ अभियंता मिलिंद जनार्दन पाटील याला मात्र दोषमुक्त करण्यात आले. या खटल्यात सरकारी वकील म्हणून सहायक सरकारी वकील ए. एम. पिरजादे यांनी काम पाहिले. या घटनेचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे माजी पोलीस उपअधीक्षक उदय आफळे, उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, सहायक फौजदार अमर भोसले यांनी केला होता.