वडणगे येथे मित्राच्याच घरात केला हात साफ; तीस हजारांचा मुद्देमाल लंपास

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मित्राच्याच घरामध्ये राहणाऱ्या एकाने मित्राची मोटरसायकल आणि मोबाईल असा सुमारे ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी खय्युम गफूर नरंगलकर (वय २२, मूळ रा. नरंगलक देगळूर जि. नांदेड, सध्या रा. वडणगे) याने आकाशसिंग रणजीतसिंग ठाकूर (मूळ रा. असापूर, जि. नांदेड, सध्या रा. वडणगे) याच्याविरोधात करवीर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.… Continue reading वडणगे येथे मित्राच्याच घरात केला हात साफ; तीस हजारांचा मुद्देमाल लंपास

पूर्ववैमनस्यातून एकाला मारहाण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पूर्ववैमनस्यातून  झालेल्या मारहाणीत एकजण जखमी झाला. रावसाहेब पांडुरंग धुमाळ (वय ५३, रा. सोमराज कॉम्प्लेक्स, नाळे कॉलनी) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी अनिल सुभाष वाळवेकर (रा. जुना वाशी नाका) याच्यासह तिघांविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,रावसाहेब धुमाळ आणि अनिल वाळवेकर यांच्यात पूर्ववैमनस्य आहे. त्यातून अनिल… Continue reading पूर्ववैमनस्यातून एकाला मारहाण…

भाजपचा माजी खासदार पत्नीसह बेपत्ता   

पुणे (प्रतिनिधी) : वादग्रस्त विधाने करून नेहमी चर्चेत राहणारे भाजपचे माजी खासदार संजय काकडे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण मेव्हण्याला  गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात येणार आहे. चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्यांच्या घरी आणि कार्यालयात त्यांना अटक करण्यासाठी गेले होते. परंतु ते त्या ठिकाणी सापडले नाहीत. संजय काकडे यांनी स्वतःच्या मेव्हण्याला… Continue reading भाजपचा माजी खासदार पत्नीसह बेपत्ता   

अर्णब गोस्वामी म्हणजे व्हायरस

मुंबई (प्रतिनिधी) : रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यामुळे त्यांना पैसे मिळाले नाहीत. पैसे मिळाले असते, तर माझा नवरा आज जिवंत असता. अर्णब गोस्वामी हा व्हायरस आहे, अशी टीका अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी केली आहे.   माझ्या नवऱ्याने सुसाईड नोटमध्ये तीन लोकांची नावे लिहिलेली होती. त्यात अर्णब गोस्वामीचे नांव आहे. अर्णबसारख्या माणसांची… Continue reading अर्णब गोस्वामी म्हणजे व्हायरस

दुचाकी चोरट्यास अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बालिंगा (ता. करवीर) येथील एका हॉटेलजवळ लावलेली दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यास  आज (मंगळवार) करवीर पोलिसांनी अटक केली. शरद आकाराम कुंभार (वय २७, रा. कुंभार गल्ली, म्हारूळ, ता. करवीर) असे या चोरट्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. महेश रूपचंद ओसवाल हे सराफ व्यावसायिक आहेत. २८ ऑक्टोबर रोजी ते बालिंगा… Continue reading दुचाकी चोरट्यास अटक

बांधकामावरील शेडचा दरवाजा उचकटून ९१ हजारांची रोकड लंपास

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुईखडी परिसरात सुरू असणाऱ्या बांधकामावरील पत्र्याच्या शेडचा दरवाजा उचकटून  चोरट्यांनी ९१ हजार रुपयांची रोकड लंपास केली. या प्रकरणी संजय रामेश्वर प्रजापती (वय २९, मूळ रा. पलूस झारखंड, सध्या रा. पुईखडी) याने करवीर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पुईखडी येथील एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी… Continue reading बांधकामावरील शेडचा दरवाजा उचकटून ९१ हजारांची रोकड लंपास

भाजप आमदाराची अमिताभ बच्चनविरोधात तक्रार

मुंबई (प्रतिनिधी) : ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमातील सूत्रसंचालनामुळे बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन अडचणीत येण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर आक्षेप घेत सोनी टीव्ही आणि अमिताभ बच्चन यांच्याविरोधात भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी तक्रार दाखल केली आहे. अभिमन्यू पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाद्वारे हिंदू धर्मीयांची… Continue reading भाजप आमदाराची अमिताभ बच्चनविरोधात तक्रार

देवीचा कोप झाल्याचे भासवून एकाला ६ लाख ६७ हजारांचा गंडा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जुना वाशी नाका जवळील एका कुटुंबाला, ‘तुमच्या घरावर देवीचा कोप झाला आहे’, असे सांगून ६ लाख ६७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिनकर हरी सुर्यवंशी (वय ६५, रा. देवकर पाणंद, पेट्रोल पंपाजवळ जुना वाशी नाका) यांनी एजंट दीपक पांडुरंग पाटील (रा. भोसलेवाडी) याच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये… Continue reading देवीचा कोप झाल्याचे भासवून एकाला ६ लाख ६७ हजारांचा गंडा

टोप परिसरात मटका खेळणाऱ्या दोघांना अटक

टोप (प्रतिनिधी) : टोप येथील राजीव गांधीनगरमध्ये मटका खेळणाऱ्या दोघांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने कारवाई करून ४०६० रू. आणि मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त केल्या आहेत. मागील अनेक वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातून मटका खेळणाऱ्यांच्या मुसक्या आवळून त्याना पोलिसांनी सळो की पळो केले. मात्र वर्षानंतर जिल्ह्यात मटका व्यवसायाचे डोके वर काढण्याचा प्रयत्न काही मटका मालक करत आहेत. टोप येथील… Continue reading टोप परिसरात मटका खेळणाऱ्या दोघांना अटक

पाटपन्हाळा येथील अल्पवयीन मुलीस अज्ञाताने पळविले

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील पाटपन्हाळा येथील रघुनाथ यशवंत पाटील यांच्या अल्पवयीन मुलीला (वय १५) त्यांच्या राहत्या घरातून अज्ञाताने दि. ३१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पळवून नेले. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी कळे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तरी सादर घटनेचा पुढील तपास सपोनि श्रीकांत इंगवले करत आहेत.

error: Content is protected !!