कोल्हापूर (प्रतिनिधी) : बालिंगा (ता. करवीर) येथील एका हॉटेलजवळ लावलेली दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यास  आज (मंगळवार) करवीर पोलिसांनी अटक केली. शरद आकाराम कुंभार (वय २७, रा. कुंभार गल्ली, म्हारूळ, ता. करवीर) असे या चोरट्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

महेश रूपचंद ओसवाल हे सराफ व्यावसायिक आहेत. २८ ऑक्टोबर रोजी ते बालिंगा येथील एका हॉटेलजवळ कामानिमित्त गेले होते. त्या वेळी त्यांनी त्यांची दुचाकी या हॉटेलजवळ लावली होती. ही मोपेड लंपास करण्यात आली. याप्रकरणी ओसवाल यांनी फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार तपास करून करवीर पोलिसांनी शरद कुंभार याला अटक केली.