कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील पाटपन्हाळा येथील रघुनाथ यशवंत पाटील यांच्या अल्पवयीन मुलीला (वय १५) त्यांच्या राहत्या घरातून अज्ञाताने दि. ३१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पळवून नेले. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी कळे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

तरी सादर घटनेचा पुढील तपास सपोनि श्रीकांत इंगवले करत आहेत.