मुंबई (प्रतिनिधी) : रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यामुळे त्यांना पैसे मिळाले नाहीत. पैसे मिळाले असते, तर माझा नवरा आज जिवंत असता. अर्णब गोस्वामी हा व्हायरस आहे, अशी टीका अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी केली आहे.  

माझ्या नवऱ्याने सुसाईड नोटमध्ये तीन लोकांची नावे लिहिलेली होती. त्यात अर्णब गोस्वामीचे नांव आहे. अर्णबसारख्या माणसांची ही मानसिकता असून कामे करून घेतात आणि पैसे देत नाहीत. माझ्या मते कोणत्याही नागरिकाने याला न्याय देऊ नये. आम्ही सुशांतसिंह राजपूत नाही, असेही अक्षता नाईक यांनी म्हटले आहे.   दरम्यान, अर्णब गोस्वामी माझ्या वडिलांना वारंवार धमक्या देत होते. पैसै तुला मिळणारच नाही. जे मिळालेत ते पण मी कसे वसूल करतो, हे मी बघून घेईन, अशा धमक्या दिल्याचा आरोप नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.