कोल्हापूर (प्रतिनिधी) : पूर्ववैमनस्यातून  झालेल्या मारहाणीत एकजण जखमी झाला. रावसाहेब पांडुरंग धुमाळ (वय ५३, रा. सोमराज कॉम्प्लेक्स, नाळे कॉलनी) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी अनिल सुभाष वाळवेकर (रा. जुना वाशी नाका) याच्यासह तिघांविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,रावसाहेब धुमाळ आणि अनिल वाळवेकर यांच्यात पूर्ववैमनस्य आहे. त्यातून अनिल वाळवेकर याने रावसाहेब धुमाळ यांना शिवीगाळ केली होती. याचा जाब विचारण्यासाठी रावसाहेब धुमाळ आणि त्यांचे मित्र सतीश माने हे दोघे काल रात्री जुना वाशीनाका जवळ गेले होते. त्यावेळी अनिल वाळवेकरसह तिघांनी रावसाहेब धुमाळ यांना बेदम मारहाण केली. त्यावेळी झालेल्या हल्ल्यात रावसाहेब धुमाळ जखमी झाले. याप्रकरणी त्यांनी अनिल वाळवेकर, शिखलगार आणि वाळवेकर यांचा चुलत सासरा या तिघांनविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.