रोप वाटिकेसाठी ‘इतके’ अनुदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करण्यासाठी टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा इतर भाजीपाला पिकांसाठी रोपवाटिका उभारण्यासाठी अनुदान देण्यात येते. यासाठी इच्छूकांनी आपले अर्ज mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले. रोपवाटिकेसाठी १०… Continue reading रोप वाटिकेसाठी ‘इतके’ अनुदान

जास्त उत्पन्नासाठी शेतीमध्ये मेंढ्यांचे तळ बसविण्याकडे शेतकऱ्यांचा कल

सावरवाडी (प्रतिनिधी) : आधुनिक युगात शेती पिकातून जास्त उत्पन्न मिळण्यासाठी करवीर तालुक्यात  ग्रामीण भागात भात पिकाच्या क्षेत्रात मेंढ्यांचे तळ बसविण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. भात पिकांच्या कापण्या, मळणीच्या कामे ग्रामीण भागात जोरात सुरू आहेत. भात पिकांच्या शेतीमध्ये शेळ्या मेंढ्यांचे तळ बसविण्यात येत आहे. शेतीमध्ये मोकळ्या शिवारात मेंढ्यांचे तळ बसविण्यासाठी मेंढपाळ व्यवसायिकांची धावपळ सुरू होऊ लागली… Continue reading जास्त उत्पन्नासाठी शेतीमध्ये मेंढ्यांचे तळ बसविण्याकडे शेतकऱ्यांचा कल

२५ हजार शेतकऱ्यांना दिवसा पूर्णवेळ वीजपुरवठा : डॉ. नितीन राऊत

मुंबई (प्रतिनिधी) : रात्रीच्या वेळेस कृषिपंपांना देण्यात येणाऱ्या वीजपुरवठयामध्ये येणाऱ्या अडचणी, शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या विधायक सूचना विचारात घेऊन शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे उपकेंद्राजवळ सौर ऊर्जा प्रकल्प उभारुन निर्माण होणारी वीज कृषी वाहिनीद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यात येणार आहे, असे ऊर्जामंत्री ना. डॉ नितीन राऊत यांनी सांगितले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील किमान ५० वीज वाहिन्यावरील सुमारे २५ हजार  शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याबद्दल ऊर्जामंत्र्यांनी निर्देश दिले होते, त्यानुसार ही योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील… Continue reading २५ हजार शेतकऱ्यांना दिवसा पूर्णवेळ वीजपुरवठा : डॉ. नितीन राऊत

मागण्या मान्य करा अन्यथा साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही : आ. गोपीचंद पडळकर

पंढरपूर (प्रतिनिधी) : राज्यात ऊस गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊस तोड मजूर, मुकादम, वाहतूकदार यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही. असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. साखर कारखान्याशी संबधित असलेल्या असंघटित कामगारांना न्याय देण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता या प्रश्नात लक्ष घातले आहे. यासाठी त्यांनी सांगली सोलापूर… Continue reading मागण्या मान्य करा अन्यथा साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही : आ. गोपीचंद पडळकर

करवीर तालुक्यात भुईमूग काढणीच्या कामांची धांदल

सावरवाडी (प्रतिनिधी) : गेल्या चार पाच दिवसापासून पावसाने थोडीफार उघडीप दिल्याने करवीर तालुक्यात खरीप हंगामातील भुईमूग पीकांच्या काढणीच्या कामांची धांदल वाढू लागली आहे. खरीप हंगामातील पीकांच्या सुगीची चाहुल लागल्याने भुईमूग, सोयाबीन, रताळे, वरी यासारख्या पीकांची काढणी-मळणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. शाळा, कॉलेज अजूनही बंद असल्यामुळे विद्यार्थीही शेतीच्या कामात दंग झाल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत… Continue reading करवीर तालुक्यात भुईमूग काढणीच्या कामांची धांदल

आळते येथे श्री किसान सेंद्रिय भाजीपाला खरेदी-विक्री केंद्राचे उद्घाटन…

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील कसबा आळते येथे आर्ट ऑफ लिव्हींग परिवार यांच्या श्री श्री किसान मंच सेंद्रिय भाजीपाला खरेदी-विक्री केंद्राचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाचे उदघाटन खंडेराव मिरजकर, महेश हिरवे,शशिकांत पिसे यांच्या हस्ते करण्यात आले. हे सेंद्रिय भाजीपाला खरेदी विक्री केंद्र उघडण्याचा मूळ उद्देश म्हणजे किटकनाशक आणि रासायनिक खताच्या अति वापरामुळे माणसाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम… Continue reading आळते येथे श्री किसान सेंद्रिय भाजीपाला खरेदी-विक्री केंद्राचे उद्घाटन…

ऊस परिषद होणारच ! : राजू शेट्टी (व्हिडिओ)

यंदाची ऊस परिषद होणारच आणि आम्ही जो निर्णय घेऊ तो कारखानदार, सरकारला मान्य करावा लागेल असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.  

तर मजूर ऊस तोडणार नाहीत : आ. सुरेश धस  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ऊस तोडणी गळीत हंगाम तोंडावर आला आहे. पण ऊस तोडणी आणि वाहतुकीचा दर वाढीचा करार झाल्याशिवाय ऊसतोड कामगार ऊस तोडणीसाठी जाणार नाहीत. या देशात मैला साफ करणाऱ्यांसाठी कायदा होऊ शकतो, तर ऊस तोड कामगारांसाठी का नाही ? असा प्रश्न आमदार सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे.राज्यातील ऊसतोडणी मजूर व वाहतुकदारांनी रोजगार वाढीसाठी… Continue reading तर मजूर ऊस तोडणार नाहीत : आ. सुरेश धस  

कृषी यांत्रिकीकरण अनुदानासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कृषी यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी आपले अर्ज mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे. शेतकऱ्यांची पोर्टलवर नोंदणी आणि अर्ज सादर करण्याची कार्यपध्दती बाबतची माहिती पोर्टलवर ‘ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना’या सदराखाली देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमधील सर्व कृषी अवजारे… Continue reading कृषी यांत्रिकीकरण अनुदानासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत

महाराष्ट्रातील भातांच्या महत्त्वाच्या वाणांची देवानघेवाण करणार : डॉ. शिरीषा

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील चालू वर्षी नव्याने संशोधित करण्यात आलेल्या पैय्यू पौर्णिमा या भाताच्या वाणाचे आज सादरीकरण करण्यात आले. या भाताचे वाण आंध्रप्रदेश, तेलंगणा, आणि छत्तीसगड येथे पोहोचणार आहे. आंध्र आणि महाराष्ट्रातील भाताच्या महत्त्वाच्या वाणांची देवानघेवाण करण्याचा उपक्रम राबविणार असल्याचे डॉ. शिरिषा यांनी सांगितले. डॉ. शिरीषा या महाराष्ट्रातील भात पिकांच्या विविध वाणांची पाहाणी आणि… Continue reading महाराष्ट्रातील भातांच्या महत्त्वाच्या वाणांची देवानघेवाण करणार : डॉ. शिरीषा

error: Content is protected !!