सावरवाडी (प्रतिनिधी) : आधुनिक युगात शेती पिकातून जास्त उत्पन्न मिळण्यासाठी करवीर तालुक्यात ग्रामीण भागात भात पिकाच्या क्षेत्रात मेंढ्यांचे तळ बसविण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.
भात पिकांच्या कापण्या, मळणीच्या कामे ग्रामीण भागात जोरात सुरू आहेत. भात पिकांच्या शेतीमध्ये शेळ्या मेंढ्यांचे तळ बसविण्यात येत आहे. शेतीमध्ये मोकळ्या शिवारात मेंढ्यांचे तळ बसविण्यासाठी मेंढपाळ व्यवसायिकांची धावपळ सुरू होऊ लागली आहेत.
मध्य महाराष्ट्रात जून महिन्यात स्थलांतरीत झालेले मेंढपाळ व्यवसायिक गावाच्या ओढीने येऊ लागले आहेत. एका रात्रीस ३०० रूपये एका तळास दर मेंढपाळ व्यवसायिक घेऊ लागले आहेत. शेळ्या मेंढ्याच्या तळामुळे शेती पिकांना जैविक खताचा उत्तम लाभ मिळत असतो.