राधानगरी तालुक्यात रोपलागणीला जोरदार सुरुवात…

राशिवडे (प्रतिनिधी) :  मागील महिन्यात मान्सूनचे आगमन जोरदार झाले. दोन ते तीन दिवसातच नद्यांची पाणीपातळी वाढली. त्यामुळे काही ठिकाणी नद्यांनी आपले पात्र सोडले होते. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी रोपलागवण करुन मोकळा झाले. पण त्यानंतर पाऊस महिनाभर गायबच झाला. त्यामुळे ही लावलेली रोपे पाण्याअभावी सुकू लागली. वेधशाळेने पाऊस १८ तारखेनंतर सुरू होईल असं जाहीर केले होते. पण… Continue reading राधानगरी तालुक्यात रोपलागणीला जोरदार सुरुवात…

टाकळीमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

शिरोळ (प्रतिनिधी) : कृष्णा नदीवर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाला चंदुर गावाकडील बाजूने टाकलेल्या भरावामुळे टाकळी भागातील शेतात नदीचे पाणी घुसले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही शासनाच्या समन्वयाने नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे   सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले. यावेळी ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी… Continue reading टाकळीमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

गोकुळ हर्बल गार्डन आयुर्वेदिक औषधांचा वापर जास्तीत जास्त करावा : विश्वास पाटील

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : दूध उत्पादकांना आणि संघाच्या प्रशिक्षण केंद्राकडे येणाऱ्या प्रशिक्षणाथींना आयुर्वेदिक गुणकारी असलेल्या वनस्पतींची माहिती होण्यासाठी हर्बल गार्डनची निर्मिती केली आहे. याचे उद्घाटन संघाचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी) आणि जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ताराबाई पार्क येथे जनावरांच्या रोग निदान प्रयोगशाळेचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. विश्वास पाटील म्हणाले की,… Continue reading गोकुळ हर्बल गार्डन आयुर्वेदिक औषधांचा वापर जास्तीत जास्त करावा : विश्वास पाटील

दुधाला आधारभूत किंमत देणारा कायदा करणार : ना. सुनील केदार

मुंबई (प्रतिनिधी) :  दुधाला कायमस्वरुपी चांगला दर मिळावा यासाठी राज्य सरकार दुधाला किमान आधारभूत किंमत देणारा (एफआरपी) कायदा करणार आहे. हा कायदा खाजगी आणि सहकारी दूध संघांना लागू राहील. दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात दुधाच्या दराबाबत आज (शुक्रवार) बैठक पार पडली. दुधाला एफआरपी देणारा कायदा तातडीने केला जाईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री सुनील… Continue reading दुधाला आधारभूत किंमत देणारा कायदा करणार : ना. सुनील केदार

कृषि विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा : आ. प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) : सामान्य जनतेचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी केंद्र व राज्य शासानाच्या अनेक लोककल्याणकारी योजना आहेत. या योजनांची ग्रामीण भागातील सर्वसामन्य शेतकरी आणि नागरीकांना लाभ व्हावा. यासाठी या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, अशा सुचना आ. प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. ते भुदरगड येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे आढावा बैठकीमध्ये बोलत होते. यावेळी आ. आबिटकर… Continue reading कृषि विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा : आ. प्रकाश आबिटकर

‘त्या’ शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहनात्मक अनुदान कधी मिळणार ? : समरजितसिंह घाटगे   

मुरगूड (प्रतिनिधी) : राज्य शासनाने शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यत बिनव्याजी पीक कर्ज देण्याची घोषणा केली आहे. मात्र, यापूर्वी प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी केव्हा करणार, असा सवाल भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे  यांनी पत्रकाद्वारे केला आहे. घाटगे यांनी पत्रकात म्हटले आहे की, बिनव्याजी कर्जाची योजना खरं म्हणजे यापूर्वीचीच आहे.… Continue reading ‘त्या’ शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहनात्मक अनुदान कधी मिळणार ? : समरजितसिंह घाटगे   

यापुढे मादी वासरेच जन्माला येणार… : अरुण डोंगळे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कृत्रिम रेतनाद्वारे जास्तीत जास्त मादी वासरेच जन्मास येऊन दूध उत्पादन वाढावे व उत्पादकास आर्थिक फायदा व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत ९० टक्के मादी वासरेच जन्मास येतील अशा  लिंगविनिश्चित वीर्यामात्रा १८१ रुपये इतक्या नाममात्र किमतीत उपलब्ध करणेत येणार आहेत. गोकुळ मार्फत मादी वासरेच जन्मास येतील अशा लिंगविनिश्चित केलेल्या वीर्यामात्रा उपलब्ध करणेत आल्या होत्या,… Continue reading यापुढे मादी वासरेच जन्माला येणार… : अरुण डोंगळे

क्षारपड जमिनीच्या सुधारणा योजनांसाठी यापुढेही सहकार्य : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यामध्ये क्षारपड जमिनीचे प्रमाण मोठे आहे. या सर्व जमिनी पिकाखाली आणण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने सुधारणा करणे काळाची गरज आहे. त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी क्षारपड जमीन सुधारणा योजनांचे काम सुरू आहे. अशा योजना राबवणाऱ्यांना यापुढेही सहकार्य राहणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले. हेरवाड येथे राजेंद्र पाटील-यड्रावकर क्षारपड जमिन सुधारणा… Continue reading क्षारपड जमिनीच्या सुधारणा योजनांसाठी यापुढेही सहकार्य : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

मसाई पठार, इंजोळे, पन्हाळा परिसरातील डोंगराला आग : जैवविविधतेचे मोठे नुकसान

पन्हाळा (प्रतिनिधी) : जिल्ह्यात डोंगराला आगी लागण्याचे सत्र सुरूच आहे. मागील आठवड्यात सादळे-मादळे डोंगराला आग लागून दुर्मिळ वनसंपदा नष्ट झाली होती. आज (बुधवार) सायंकाळी पन्हाळा तालुक्यातील मसाई पठार, इंजोळे, पन्हाळा परिसरात आग लागली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने ही आग काही क्षणात चांगलीच भडकली. यामध्ये जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले आहे. काही दिवसांपासून डोंगराला आगी लागण्याचे प्रमाण वाढले… Continue reading मसाई पठार, इंजोळे, पन्हाळा परिसरातील डोंगराला आग : जैवविविधतेचे मोठे नुकसान

कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रिय गटांना वाहन वाटप

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कृषी विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सेंद्रिय गटांना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते आज (बुधवार) वाहन वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पीजीएस ऑरगॅनिक प्रमाणपत्राचे प्राथमिक स्वरुपात वाटप करण्यात आले. यावेळी महालक्ष्मी सेंद्रिय गटाला सेंद्रिय भाजीपाला बास्केट भेट म्हणून देण्यात आले. जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेती योजनेअंतर्गत एकूण ३७ गट स्थापन झाले आहेत. या गटांना… Continue reading कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रिय गटांना वाहन वाटप

error: Content is protected !!