शिरोळ तालुक्यातील २६५ पूरग्रस्तांना २ कोटी २५ लाखांचा मिळणार लाभ…

जयसिंगपूर (प्रतिनिधी) : जुलै २०१९ मध्ये आलेल्या महापूरामध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. यातील बहुतांशी शेतकऱ्यांना पीक नुकसानीची रक्कम तर काहींना पीककर्ज माफी मिळाली होती. तर यामधील काही शेतकऱ्यांचे उशिरा झालेले पंचनामे आणि संबंधित बँकांच्या चुकीच्या माहितीमुळे शिरोळसह जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले होते.   याबाबतचा विस्तृत अहवाल जिल्हा लेखापरीक्षण आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने… Continue reading शिरोळ तालुक्यातील २६५ पूरग्रस्तांना २ कोटी २५ लाखांचा मिळणार लाभ…

मतलबी अधिकाऱ्यांमुळे ‘आत्मा’तील ‘आत्मा’च हरवला…

कोल्हापूर (उत्तम पाटील) : शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करावी आणि विविध योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून शासनाने ‘आत्मा’ संस्थेची निर्मिती केली. पण कोल्हापूर जिल्ह्यात संबंधित अधिकाऱ्यांनी स्वार्थासाठी केवळ काही शेतीगटांशी सलोखा करून इतर शेतीगटांना मात्र वाऱ्यावर सोडल्याचे विदारक चित्र आहे. त्यामुळे मतलबी अधिकाऱ्यांमुळे ‘आत्मा’तील ‘आत्मा’च हरवला असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.  ‘आत्मा’ च्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न… Continue reading मतलबी अधिकाऱ्यांमुळे ‘आत्मा’तील ‘आत्मा’च हरवला…

…अन्यथा जीएसटी, आयकर भवन बेमुदत बंद पाडू : राजू शेट्टी (व्हिडिओ)

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्यावतीने आज कोल्हापुरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे.  

कासारवाडी येथे क्रॉपसॅप शेतीशाळेतून शेतकऱ्यांना मार्गदर्शन…

टोप (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथे तालुका कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी विभाग, पेठवडगांव यांच्यावतीने क्रॉपसॅप संलग्न शेतीशाळा वर्ग पार पडला. यात कृषीभूषण शेतकरी मच्छिंद्र कुंभार, कृषी पर्यवेक्षक महादेव जाधव, रामचंद्र पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी रब्बी हंगामात ज्वारी लागवडीची माहिती यामध्ये दिली. तसेच बी-बियाणे, गुणवत्ता पीक विमा, शेततळे,… Continue reading कासारवाडी येथे क्रॉपसॅप शेतीशाळेतून शेतकऱ्यांना मार्गदर्शन…

‘घरफाळा सवलती’वरून कृती समिती आक्रमक : उपायुक्तांच्या कार्यालयाला धडक (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेचा घरफाळा सवलत योजनेतील समस्येबाबत शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने महापालिकेसमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली. पूर्वकल्पना देऊनही उपायुक्त निखिल मोरे निवेदन स्वीकारण्यास उपस्थित न राहिल्याने त्यांच्या खुर्चीला निवेदन चिकटवून त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. महापालिकेच्या वतीने संपूर्ण थकीत घरफाळा भरल्यास त्यांच्या दंडव्याजात जानेवारी २०२० अखेर ७० टक्के, फेब्रुवारी… Continue reading ‘घरफाळा सवलती’वरून कृती समिती आक्रमक : उपायुक्तांच्या कार्यालयाला धडक (व्हिडिओ)

दिल्लीतील आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला तर..! : राजू शेट्टींचा सरकारला इशारा (व्हिडिओ)

दिल्लीत उद्या (२६ जानेवारी) शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन (मार्च) होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला ‘हा’ इशारा दिला.  

धामणीखोऱ्यात शेतकऱ्यांचा आधुनिक तंत्राद्वारे पीक घेण्याचा कल…

कळे (प्रतिनिधी) :  धामणीखोऱ्यात उन्हाळी भात रोप लागणीला वेग आला आहे.  शिवारात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात धांदल दिसून येत आहे. मात्र, यावेळी शेतकरी आधुनिक तंत्राद्वारे भाताचे पीक घेऊ लागला आहे. ऊस पीक सलग काही वर्षे घेतल्यानंतर पीकात बदल व्हावा आणि जमिनीचा पोत सुधारावा या उद्देशाने शिवारात अनेक शेतकरी ऊस काढणीनंतर भात पीक घेण्यात व्यस्त आहेत. यासाठी… Continue reading धामणीखोऱ्यात शेतकऱ्यांचा आधुनिक तंत्राद्वारे पीक घेण्याचा कल…

यश, राजकारण आणि मल्टीस्टेटसारख्या मुद्द्यांवर ‘गोकुळ’च्या डॉ. घाणेकर यांची विशेष मुलाखत (व्हिडिओ)

गोकुळच्या यशाचे रहस्य काय ? मल्टीस्टेट कितपत फायद्याचं ? गोकुळमध्ये राजकारण कितपत होतंय ? गोकुळचे २०२१ चे व्हिजन काय ? यांसारख्या विवध प्रश्नांवर काय म्हणाले गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. डी. व्ही. घाणेकर पहा विशेष मुलाखत ‘लाईव्ह मराठी’वर…  

जिल्ह्यात पाच ठिकाणी धान खरेदी केंद्रे सुरू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात राज्य शासनाच्यावतीने आधारभूत किंमत धान खरेदी योजना हंगाम २०२०-२१ अंतर्गत पाच ठिकाणी धान खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत, अशी माहिती दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी दिली. चंदगड तालुका खरेदी-विक्री संघामार्फत तुर्केवाडी, चंदगड ता. कृषीमाल फलोत्पादन अडकूर, आजरा किसान सह. भात खरेदी विक्री संघ मर्या. आजरा, उदयगिरी शाहूवाडी… Continue reading जिल्ह्यात पाच ठिकाणी धान खरेदी केंद्रे सुरू

शेतकरी आंदोलकांना शरद पवार यांनी दिली हमी…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा ३४ वा दिवस आहे. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. ३० डिसेंबर अर्थात उद्या पुन्हा एकदा सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आंदोलक शेतकऱ्यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांची… Continue reading शेतकरी आंदोलकांना शरद पवार यांनी दिली हमी…

error: Content is protected !!