दिलासादायक : कोरोनाची दुसरी लाट लवकरच ओसरणार…

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोनाने मृत होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरही मोठा ताण आला आहे. ऑक्सिजन, रेमडिसीवीर इंजेक्शनची कमतरता भासत आहे. अशी विदारक परिस्थिती असताना आता कोरोनाची दुसरी लाट कधी कमी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ.… Continue reading दिलासादायक : कोरोनाची दुसरी लाट लवकरच ओसरणार…

कलाविश्वाला धक्का : गुणी अभिनेत्याचा कोरोनाने मृत्यू…

मुंबई (प्रतिनिधी) : मनोरंजनविश्वाला धक्का देणारे एक दु:खद वृत्त आहे. चित्रपट, वेब सिरीज, मालिकांमध्ये आपल्या सहजसुंदर अभिनयाच्या ठसा उमटवलेले अभिनेते विक्रमजीत कंवरपाल (वय ५४) यांचे कोरोनाने निधन झाले आहे. दोन आठवड्यांपासून मुंबईतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. कंवरपाल यांनी भारतीय सैन्यात मेजर म्हणून सेवा बजावली. २००३ साली सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर अभिनय क्षेत्राकडे ते… Continue reading कलाविश्वाला धक्का : गुणी अभिनेत्याचा कोरोनाने मृत्यू…

राज्यात लसीकरण वाढविणार, आणखी निर्बंध नाहीत : मुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने लॉकडाऊन जाहीर केला नसता तर कोरोना रुग्णांची संख्या ९ ते १० लाखांवर गेली असती. नाइलाजाने कडक निर्बंध लागू करणे राज्य सरकारला भाग पडले. राज्यातील जनता संयमाने हे निर्बंध पाळत आहे. आणखी कडक निर्बंध लागणार नाहीत. स्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी जनतेला आणखी काही दिवस निर्बंध पाळावे लागतील, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव… Continue reading राज्यात लसीकरण वाढविणार, आणखी निर्बंध नाहीत : मुख्यमंत्री

राज्यातील शाळांना उद्यापासून सुट्टी…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ऑनलाईन शाळांना आता सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना १ मे पासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. १ मे ते १३ जून असा हा सुट्टीचा कालावधी असणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष १४ जून पासून सुरू होणार आहे. राज्यातील शिक्षक संघटनेकडून… Continue reading राज्यातील शाळांना उद्यापासून सुट्टी…

राज्यात लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढला : नवा आदेश जारी

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारने सध्या राज्यात सुरू असलेला लॉकडाउन १५ मे पर्यंत वाढवला आहे. सरकारने यासंदर्भात आदेश काढला असून त्यानुसार सध्या राज्यात लागू असलेले निर्बंध १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर यासंदर्भातले संकेत दिले होते. त्यानुसार आज (गुरुवार) सायंकाळी… Continue reading राज्यात लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढला : नवा आदेश जारी

परमबीर सिंग यांचा ठाकरे सरकारवर पुन्हा गंभीर आरोप

मुंबई (प्रतिनिधी) : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात लिहिलेले पत्र मागे घेण्यासाठी दबाव येत आहे. तसेच राज्य सरकार एकापाठोपाठ एक गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती मिळाल्याचा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली आहे. परमबीर सिंग यांनी राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या चौकशीला… Continue reading परमबीर सिंग यांचा ठाकरे सरकारवर पुन्हा गंभीर आरोप

यंदाही महाराष्ट्र दिन साधेपणाने : राज्य सरकारने जारी केल्या सूचना

मुंबई  (प्रतिनिधी) :  राज्यात लॉकडाऊन सदृश कठोर निर्बंध लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ यावर्षीही  अत्यंत साधेपणाने साजरा करावा, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेने दिल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोविड-१९ च्या अनुषंगाने दिलेल्या सुरक्षित वावर व इतर सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे. सर्वांसाठी मास्क बंधनकारक… Continue reading यंदाही महाराष्ट्र दिन साधेपणाने : राज्य सरकारने जारी केल्या सूचना

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण : राजेश टोपे

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य सरकारने १८ ते ४४ वर्षांपर्यंतच्या नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोफत करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. मोफत लसीकरण करण्यासाठी डोस विकत घ्यावे लागणार असून त्यासाठी राज्य सरकारला सुमारे साडेसहा हजार कोटी खर्च येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (बुधवार) दुपारी दिली. मात्र, केवळ सरकारी रुग्णालयातच ही लस मोफत मिळणार असून… Continue reading राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण : राजेश टोपे

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचे निधन

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील आणि  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचे आज (बुधवार) सकाळी निधन झाले. गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.   कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू होते.  मात्र उपचार सुरु असतानाच आज सकाळी १०… Continue reading काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचे निधन

कर्नाटकात उद्यापासून कडक लॉकडाऊन : येडियुरप्पांंची घोषणा

बंगळुरू (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने देशभरात भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. तरीही दिवसेंदिवस हा आकडा वाढत असल्याने प्रशासकीय यंत्रणांवर ताण वाढू लागला आहे. काही राज्यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला तर काही राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत. आता कर्नाटक सरकारनेही लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून (२७… Continue reading कर्नाटकात उद्यापासून कडक लॉकडाऊन : येडियुरप्पांंची घोषणा

error: Content is protected !!