मुंबई (प्रतिनिधी) : राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील आणि  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचे आज (बुधवार) सकाळी निधन झाले. गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  

कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू होते.  मात्र उपचार सुरु असतानाच आज सकाळी १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. एकनाथ गायकवाड  यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते. तसेच ते खासदारही होते.