मुंबई (प्रतिनिधी) : मनोरंजनविश्वाला धक्का देणारे एक दु:खद वृत्त आहे. चित्रपट, वेब सिरीज, मालिकांमध्ये आपल्या सहजसुंदर अभिनयाच्या ठसा उमटवलेले अभिनेते विक्रमजीत कंवरपाल (वय ५४) यांचे कोरोनाने निधन झाले आहे. दोन आठवड्यांपासून मुंबईतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.

कंवरपाल यांनी भारतीय सैन्यात मेजर म्हणून सेवा बजावली. २००३ साली सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर अभिनय क्षेत्राकडे ते वळले. स्पेशल ऑप्स, भौकाल, श्रीकांत बशीर या वेब सिरीजसह त्यांनी कसम, मर्डर – २, पेज -३, कॉर्पोरेट, आरक्षण, हेट स्टोरी, साहो, गाझी अटॅक, २ स्टेट्स, पाप, हिरॉईन या चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका केल्या होत्या. सैन्य दलातील सेवेचा गाढा अनुभव असल्यामुळे इतर अभिनेत्यांना अभिनयासाठी सैनिकी प्रशिक्षण देण्यासाठीही कंवरपाल यांना पाचारण करण्यात येत असे. त्यांच्या निधनाने कालाविश्वला धक्का बसला आहे.