‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ची व्यापक जागृती करा : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या सरकारच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’या मोहिमेची व्यापक जागृती करावी. नगरपालिका क्षेत्रात नगरसेवक, सामाजिक संस्था, तरुण मंडळे यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात प्रचार, प्रसिध्दी करावी. चौका-चौकात होर्डिंग्ज लावावीत. प्रभागातील घराघरांवर स्टिकर्स लावावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या. ते  जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे… Continue reading ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ची व्यापक जागृती करा : जिल्हाधिकारी

धामणीखोऱ्यातील नागरिकांतून बस सेवा सुरू करण्याची मागणी

कळे (अनिल सुतार) : धामणीखोऱ्यात कोल्हापूर ते म्हासुर्ली, बावेली, चौके अशा एस टी बस सेवा सुरू होत्या. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सेवा थांबवण्यात आली आहे. सध्या मात्र भागातील अनेक कामगार कोल्हापूर येथे कामावर जात असल्याने त्यांना प्रवासासाठी अडचणी येत आहेत. तसेच अनेक नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी काही कामानिमित्त जावे लागत असून मोठ्या प्रमाणात प्रवासाची गैरसोय होत… Continue reading धामणीखोऱ्यातील नागरिकांतून बस सेवा सुरू करण्याची मागणी

शिरोली पोलीस स्टेशनकडून संजित जगताप यांच्या कुटुंबास ४ लाख २१ हजार सुपूर्द

टोप (प्रतिनिधी) : शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशनमधील पोलीस हेड कॉन्स्टेबल दिवंगत संजित विलासराव जगताप हे दिनांक २६ ऑगस्ट रोजी कोरोना विषाणू संसर्गामुळे संजय घोडावत कोविड सेंटर येथे उपचार घेत असताना मृत झाले होते. आज (बुधवार) त्यांच्या कुटुंबास शिरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जमा झालेली ४ लाख २१००० हजारांची आर्थिक मदत त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द केली. यामध्ये शिरोली… Continue reading शिरोली पोलीस स्टेशनकडून संजित जगताप यांच्या कुटुंबास ४ लाख २१ हजार सुपूर्द

मनपा महिला झाडू कामगारांचा निरोप सोहळा पार पडला

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या महाद्वारापासून ते तटाकडील तालीम चौकापर्यंत निरंतर ४४ वर्षे सेवा देणार्‍या झाडू कामगार पौर्णिमा प्रकाश कांबळे यांच्या निवृत्तीबद्दल सर्व सहकारी कर्मचार्‍यांच्या वतीने त्यांना एका छोटेखानी समारंभात हृदय निरोप देण्यात आला. २२ वर्षे रोजंदारीवर आणि पुढील २० वर्षे कायम सेवेत राहिलेल्या पौर्णिमा कांबळे यांनी आपल्या सेवेतील बहुतांश काळ हा करवीर… Continue reading मनपा महिला झाडू कामगारांचा निरोप सोहळा पार पडला

गगनबावड्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत कोविड सेंटर उभारावे : शेतकऱ्यांची मागणी

साळवण (संभाजी सुतार) : कोरोनाचा संसर्ग शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे भागातील शेतकऱ्यांचा विचार करून तालुक्यातील निवडे येथील महालक्ष्मी विकास सेवा संस्थेमार्फत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक ए. डी. माने यांना भेटून शेतकऱ्यांसाठी बँकेमार्फत कोविड सेंटर उभे करावे, किंवा बँकेमार्फत प्रत्येक तालुक्याला व्हेंटिलेटर बेड द्यावेत, असे संस्थेचे व्हाईस चेअरमन… Continue reading गगनबावड्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत कोविड सेंटर उभारावे : शेतकऱ्यांची मागणी

कोरोनामुळे जिल्हा बँकेच्या मृत्यू पावलेल्या अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मृत्यू पावलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी बँक पहाडासारखी उभी आहे,  असा विश्वास  बँकेचे अध्यक्ष आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. कोरोनाग्रस्त होऊन बरे झालेल्या कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या हॉस्पिटलचा खर्च बँक देणार असल्याचेही, त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. कोल्हापुरातील खाजगी दवाखान्यात कोरोनावर उपचार घेत असलेल्या मंत्री… Continue reading कोरोनामुळे जिल्हा बँकेच्या मृत्यू पावलेल्या अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार : मंत्री हसन मुश्रीफ

‘रेमडेसिवीर’चा घोळ आणि बरंच काही… (व्हिडिओ)

कोरोना संकटात रुग्णांच्या जीवाशी चाललेला खेळ, प्रशासनाची बोटचेपी भूमिका यासह विविध विषयांना वाचा फोडणारी रोखठोक मुलाखत…

‘त्यांनी’ बेछूट आरोप थांबवावेत, अन्यथा… : संजय भोसले

आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या नगरसेवक भूपाल शेटे यांना संजय भोसले यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.

विकास कामांच्या कृती आराखड्यात ‘यांचा’ समावेश करा : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ग्रामपंचायतीचे लेबर बजेट आणि कृती आराखडा सन २०२१-२२ तसेच सुधारित कृती आराखडा सन २०२०-२१ तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांनी आपापल्या गावच्या शिवार फेरीमध्ये सहभागी होत, माथा ते पायथा पाणलोट विकासांचा तसेच वैयक्तिक लाभाच्या आणि सामूहिक स्वरुपाच्या कामांचा समावेश कृती आराखड्यात करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. ते म्हणाले,… Continue reading विकास कामांच्या कृती आराखड्यात ‘यांचा’ समावेश करा : जिल्हाधिकारी

‘त्यांच्यावर’ दंडात्मक कारवाई करण्यात येईल

टोप (प्रतिनिधी) : शिरोली येथे कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच क्वारंटाईन व्यक्ती बाहेर फिरताना दिसत आहेत. यावर आवर घालण्यासाठी त्यांच्यावर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच शशिकांत खवरे यांनी दिली. गावात कोरोनाग्रस्तांची संख्या तीनशेच्या जवळ गेली आहे. यामुळे अधिक धोका निर्माण झाला असून या कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी ग्रामपंचायतीकडून विविध उपाययोजना करण्यात… Continue reading ‘त्यांच्यावर’ दंडात्मक कारवाई करण्यात येईल

error: Content is protected !!