कळे (अनिल सुतार) : धामणीखोऱ्यात कोल्हापूर ते म्हासुर्ली, बावेली, चौके अशा एस टी बस सेवा सुरू होत्या. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सेवा थांबवण्यात आली आहे. सध्या मात्र भागातील अनेक कामगार कोल्हापूर येथे कामावर जात असल्याने त्यांना प्रवासासाठी अडचणी येत आहेत. तसेच अनेक नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी काही कामानिमित्त जावे लागत असून मोठ्या प्रमाणात प्रवासाची गैरसोय होत आहे.

सध्या काही ठिकाणी एसटी सेवा सुरू झाली असून धामणीखोऱ्यातील सेवा मात्र अजूनही बंद असल्याने ती परिवहन विभाग आणि डेपो मँनेजर संभाजीनगर आगार यांनी याची दखल घेऊन एसटी बस सेवा पुर्ववत सुरू करण्याची मागणी कामगार आणि नागरिकांतून जोर धरू लागली आहे.