अनाधिकृत रहिवासी अतिक्रमण हटवा अन्यथा..

टोप (प्रतिनिधी) : टोप येथील गट नंबर १२७४ भागात अनाधिकृत रहिवासी अतिक्रमण झाले असून या अतिक्रमणावर २९ सप्टेंबर पर्यंत कारवाई झाली नाही, तर आम्ही ग्रामपंचायतीच्या दारात उपोषणाला बसणार असा इशारा अक्षय पाटील आणि अनिकेत गुरव यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.  गावच्या वेताळमाळावर १६ हेक्टर गायरान असून यात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत रहिवासी  अतिक्रमणे  झाली आहेत. आणि… Continue reading अनाधिकृत रहिवासी अतिक्रमण हटवा अन्यथा..

स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या अनुषंगाने परस्पर समन्वय ठेऊन प्रभावी उपाययोजना करा : आयुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या अनुषंगाने कराव्या लागणाऱ्या आवश्यक उपाययोजना आरोग्य विभागासह सर्व संबधित विभागांनी परस्पर समन्वय ठेऊन स्वच्छ सर्वेक्षणाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवविण्याची सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिल्या. केंद्र शासनाच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या वेबीनारमध्ये महापौर निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.… Continue reading स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या अनुषंगाने परस्पर समन्वय ठेऊन प्रभावी उपाययोजना करा : आयुक्त

कोल्हापूरचे राजेपण : महापौर निलोफर आजरेकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांचे नातू राजकुमार यशराजराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त आयसोलेशन येथे नव्याने स्थापन केलेल्या कोविड केअर सेंटरसाठी ५ लाखांचा जनरेटर देण्याचे जाहीर केले. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी त्यांचे चिरंजीव राजकुमार यशराजराजे छत्रपती यांचा वाढदिवस साजरा न करता कोरोना संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनांसाठी… Continue reading कोल्हापूरचे राजेपण : महापौर निलोफर आजरेकर

मुश्रीफ साहेबांसाठी काळभैरीला अभिषेक

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ कोरोनातून लवकर बरे व्हावे, यासाठी येथील संघर्ष ग्रूपच्या वतीने काळभैरीला दुधाचा अभिषेक करण्यात आला. तसेच त्यांना लवकरात लवकर जनसामान्यांच्या सेवेत रुजू करण्यासाठी काळभैरीला साकडे घालून आरती करण्यात आली. मंत्री मुश्रीफ यांना कोरोनाची बाधा झाल्यापासून कागल आणि गडहिंग्लज तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी विविध पद्धतीने देवाचा धावा सुरू केला… Continue reading मुश्रीफ साहेबांसाठी काळभैरीला अभिषेक

विना मास्कप्रकरणी १५ जणांवर दंडात्मक कारवाई…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील जयसिंगपूर नगरपरिषदेने विना मास्क फिरणाऱ्या १५ जणांकडून ३ हजार रुपयांचा दंड वसूल केला. आजअखेर १३३१ व्यक्तींकडून १ लाख ३९ हजार १८० रुपये दंडाची वसुली केली आहे. कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. यासंबंधी प्रशासन सातत्याने जागृती करीत आहे. तरीही काही जण विनामास्क फिरताना दिसत आहेत. त्यांच्या… Continue reading विना मास्कप्रकरणी १५ जणांवर दंडात्मक कारवाई…

बोरपाडळे आरोग्यवर्धिनी परिक्षेत्रातील १७ पथकांमार्फत ४० टक्के सर्वेक्षण

बोरपाडळे (प्रतिनिधी) : बोरपाडळे आरोग्यवर्धिनी अंतर्गत कार्यरत कोरोना सर्वेक्षण १७ पथकाचे काम समाधानकारक असून सुमारे ४० टक्के सर्वेक्षण झाले आहे. पथकांनी स्वतःची काळजी घेत काळजीपूर्वक तपासणी करत सर्वेक्षण माहिती मोबाईल अॅपवर भरण्याचे आवाहन पन्हाळा तहसीलदार रमेश शेडगे यांनी केले. ते बोरपाडळे येथील जय मल्हार सभाग्रहामध्ये १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान होत असलेल्या विशेष कोरोना… Continue reading बोरपाडळे आरोग्यवर्धिनी परिक्षेत्रातील १७ पथकांमार्फत ४० टक्के सर्वेक्षण

शिरोली दुमालातील कोरोनाने मयत झालेल्या कुटुंबियांची तहसिलदारांकडून विचारपूस

सावरवाडी (प्रतिनिधी) :  करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथे कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांची करवीरच्या तहसीलदार शितल मुळे-भांबरे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. तसेच काळजी घेण्याच्या सुचना केल्या. यावेळी त्यांच्या सोबत गट विकास अधिकारी जयंत उगले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जी. डी. नलवडे, गोकुळचे संचालक विश्वास पाटील, करवीर पं.स. सदस्य राजेंद्र सुर्यवंशी आदी उपस्थित होते. शिरोली दुमाला… Continue reading शिरोली दुमालातील कोरोनाने मयत झालेल्या कुटुंबियांची तहसिलदारांकडून विचारपूस

तामगावच्या वेदांत कंपनीकडून कोविड सुरक्षा साहित्य आयुक्तांकडे सुपूर्द

कोल्हापूर (प्रतिनिधी) : तामगांव येथील वेदांत टूल्स प्रा. लिमिटेडच्यावतीने सामाजिक बांधिलकी म्हणून ६ हजार एन-९५ मास्क, ४ हजार ८०० हातमोजे आणि १०० पीपीई किट असे कोविड-१९ सुरक्षा साहित्य आज (बुधवार) महापालिका आयुक्त डॉ. मलिलनाथ कलशेट्टी यांच्याकडे सुपूर्द केले. तामगांव येथील वेदांत टूल्स प्रा.लिमिटेडचे मॅनेजिक डायरेक्टर दत्तात्रय देसाई यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्यावतीने कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेसाठी सामाजिक… Continue reading तामगावच्या वेदांत कंपनीकडून कोविड सुरक्षा साहित्य आयुक्तांकडे सुपूर्द

विना मास्क ५२ जणांना दंड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कुरुंदवाड नगरपरिषदेने विना मास्क फिरणाऱ्या ५२ जणांकडून ८ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. आजअखेर विना मास्क फिरणाऱ्या १७७६ व्यक्तींकडून १ लाख ५१ हजार ६०० रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे. जयसिंगपूर नगरपरिषदेने विना मास्क फिरणाऱ्या १२ जणांकडून २ हजार ३७० रुपयांचा दंड वसूल केला आहे. आजअखेर १३१६ व्यक्तींकडून १ लाख… Continue reading विना मास्क ५२ जणांना दंड

मराठा समाजाच्या न्याय-हक्कासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील : खासदार संजय मंडलिक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व जाती-जमातींना मिळून जास्तीत जास्त ५० टक्के आरक्षण लागू करता येईल, असा नियम सर्वोच्च न्यायालयानेच घालून दिला होता. मात्र, महाराष्ट्रात मराठा आरक्षण कायद्यामुळे एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्याही वर जात असल्याने त्याविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.   मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर मा. न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. मा.… Continue reading मराठा समाजाच्या न्याय-हक्कासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील : खासदार संजय मंडलिक

error: Content is protected !!