गडहिंग्लज (प्रतिनिधी) : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ कोरोनातून लवकर बरे व्हावे, यासाठी येथील संघर्ष ग्रूपच्या वतीने काळभैरीला दुधाचा अभिषेक करण्यात आला. तसेच त्यांना लवकरात लवकर जनसामान्यांच्या सेवेत रुजू करण्यासाठी काळभैरीला साकडे घालून आरती करण्यात आली.

मंत्री मुश्रीफ यांना कोरोनाची बाधा झाल्यापासून कागल आणि गडहिंग्लज तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी विविध पद्धतीने देवाचा धावा सुरू केला आहे. आज (गुरुवार) संघर्ष ग्रूपच्या पदाधिकाऱ्यांनी रामगोंडा उर्फ गुंड्या पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील काळभैरी मंदिरात अभिषेक केला. तसेच मुश्रीफ साहेब लवकर बरे व्हावेत यासाठी आरती करण्यात आली.

यावेळी संघर्ष ग्रुपचे शिवराज पाटील, विश्वनाथ मगदूम, सुरेश पाटील, बाबुराव पाटील, कबीर मुल्ला, सिद्धेश्वर माने, राजेन्द्र माने आदींसह ग्रुपचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.