लाईव्ह मराठी इम्पॅक्ट : तुळशी-धामणी परीसरात जिओ नेटवर्क होणार पॉवरफुल

धामोड (सतीश जाधव) : राधानगरी तालुक्यातील तुळशी धामणी परीसरात जिओ, एअरटेल, आयडीया, वोडाफोन आदी कंपनींचे टॉवर. पण एकाही कंपनीचे व्यवस्थित नेटवर्क नसल्याने या अनरिचेबल नेटवर्कमुळे परिसरातील नागरिकांची घरात मोबाईल असून देखील ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ अशी अवस्था झाली आहे. शिवाय ऑनलाईन शिक्षण पध्दतीने शालेय विद्यार्थ्यांना आणि अधिकारी वर्गात शासकीय कामे करणे अवघड होत आहे.… Continue reading लाईव्ह मराठी इम्पॅक्ट : तुळशी-धामणी परीसरात जिओ नेटवर्क होणार पॉवरफुल

कळे पोलीस ठाण्यातील वरिष्ठांचा मनमानी कारभार

कळे (प्रतिनिधी) : कळे पोलीस ठाण्याअंतर्गत काही दिवसांपूर्वी मास्क न वापरणाऱ्या आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची बातमी लाईव्ह मराठीकडून प्रसिद्ध झाली होती. सध्या सगळीकडे किती जणांवर कारवाई झाली आणि किती दंड वसूल झाला, या बातम्या प्रसिद्ध होत असताना  कळे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मात्र ही माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे… Continue reading कळे पोलीस ठाण्यातील वरिष्ठांचा मनमानी कारभार

कळेमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कळे (प्रतिनिधी) : कळे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावामधील कोरोना रुग्ण संख्या सध्या १९१ झाली आहे.  त्यापैकी २० जण सध्या पॉझिटिव्ह रुग्ण आहेत तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूरमध्ये बेड उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागातील लोक तिथे जाण्यास घाबरत असल्याने स्वॅब देऊन तेथे जाण्यापेक्षा H R C T चाचणीच्या माध्यमातून घरीच स्थानिक डॉक्टरकडून अनेकजण… Continue reading कळेमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शहरातील अमृत पाईपलाईन योजनेचे काम निविदेनुसारच सुरू : महापालिका प्रशासनाचा खुलासा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनांअंतर्गत शहरातील सुधारीत नळपाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. हे काम निविदेनुसार होत नसून निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी महापालिकेवर वरात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी याबाबत महापालिका प्रशासनाने खुलासा करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे अमृत योजनेचे काम निविदेनुसारच सुरू असल्याचा खुलासा महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध पत्रकाद्वारे केला आहे. प्रसिद्धी… Continue reading शहरातील अमृत पाईपलाईन योजनेचे काम निविदेनुसारच सुरू : महापालिका प्रशासनाचा खुलासा

‘मास्क नाही प्रवेश नाही’ हा उपक्रम राज्यभर राबवा : उद्धव ठाकरे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेतंर्गत कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी ‘मास्क नाही प्रवेश नाही, मास्क नाही वस्तूही नाही, मास्क नाही सेवा नाही’ हा अभिनव उपक्रम राज्यभर राबवायला हवा, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या जनजागृती मोहिमेचा गौरव केला. पुणे महसूल विभागातील जिल्ह्यांशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडिओ प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका… Continue reading ‘मास्क नाही प्रवेश नाही’ हा उपक्रम राज्यभर राबवा : उद्धव ठाकरे

अखेर राज्यात एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित

मुंबई (प्रतिनिधी) : अखेर राज्यात एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार १६ पर्यंत स्लाईसच्या मशीनवर चाचणीकरिता २ हजार रुपये, १६ ते ६४ स्लाईसच्या मशीनवरील चाचणीकरिता २ हजार ५०० रुपये आणि ६४ ते २५६ स्लाईसच्या मशीनवरील चाचणीसाठी ३ हजार रुपये असे दर समितीने निश्चित केले आहेत. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्री. राजेंद्र… Continue reading अखेर राज्यात एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित

टोप गावास शाखा अभियंता ए. एस. शेळखे यांची भेट

टोप (प्रतिनिधी) : टोप गावात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून टोप गाव हे हातकणंगले गावातील हॉटस्पॉट झाले आहे. यामुळे याठिकाणी प्रशासनानकडून गार्भियाने लक्ष देऊन सर्व्हे तसेच इतर उपायोजना केल्या जात आहेत. यातच महाराष्ट्र शासनाचा माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत सर्व्हे सुरु असताना गावात आज (गुरुवार) शाखा अभियंता हातकणंगले ए. एस. शेळखे यांनी टोप गावास अचानक… Continue reading टोप गावास शाखा अभियंता ए. एस. शेळखे यांची भेट

चंदगड तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी प्रविण मल्लीकार्जून वाटंगी

चंदगड (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांची निवड करण्यात आली. चंदगडचे सामाजिक कार्यकर्ते  प्रविण मल्लीकार्जून वाटंगी यांची संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात झाली. या व्यतिरिक्त अमरोळीचे सामाजिक कार्यकर्ते महादेव दत्तू मंडलिक-पाटील, मागासवर्गीय सदस्य कृष्णा यल्लापा कांबळे, इतर मागासवर्गीय सदस्य म्हणून सलीम कासीम मोमीन व गुंडू… Continue reading चंदगड तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी प्रविण मल्लीकार्जून वाटंगी

औषध घोटाळ्याची चौकशी : अमन मित्तल (व्हिडिओ)

कोरोना आजारावरील औषध खरेदी घोटाळा गाजत आहे. याची पूर्व चौकशी मुख्य लेखापालातर्फे सुरु असल्याचे सीईओ अमन मित्तल यांनी सांगितले.

अनाधिकृत रहिवासी अतिक्रमण हटवा अन्यथा..

टोप (प्रतिनिधी) : टोप येथील गट नंबर १२७४ भागात अनाधिकृत रहिवासी अतिक्रमण झाले असून या अतिक्रमणावर २९ सप्टेंबर पर्यंत कारवाई झाली नाही, तर आम्ही ग्रामपंचायतीच्या दारात उपोषणाला बसणार असा इशारा अक्षय पाटील आणि अनिकेत गुरव यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.  गावच्या वेताळमाळावर १६ हेक्टर गायरान असून यात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत रहिवासी  अतिक्रमणे  झाली आहेत. आणि… Continue reading अनाधिकृत रहिवासी अतिक्रमण हटवा अन्यथा..

error: Content is protected !!