टोप (प्रतिनिधी) : टोप येथील गट नंबर १२७४ भागात अनाधिकृत रहिवासी अतिक्रमण झाले असून या अतिक्रमणावर २९ सप्टेंबर पर्यंत कारवाई झाली नाही, तर आम्ही ग्रामपंचायतीच्या दारात उपोषणाला बसणार असा इशारा अक्षय पाटील आणि अनिकेत गुरव यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. 

गावच्या वेताळमाळावर १६ हेक्टर गायरान असून यात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत रहिवासी  अतिक्रमणे  झाली आहेत. आणि ही अतिक्रमणे सन २०१८ नंतरची आहेत.  याठिकाणी असलेली अतिक्रमणे ही जास्त करून बाहेरील लोकांची आहेत. या वेताळमाळ येथील सर्व अतिक्रमणे काढून गावाला क्रिडांगणासाठी तसेच ज्यांना खरच गरज आहे त्यांना शासनाच्या नियमानुसार द्यावी. 

ही सर्व अतिक्रमणे काढून वेताळमाळ रिकामा करावा अन्यथा टोप ग्रामपंचायतीच्या समोर आमरण उपोषणाला बसणार आहे असा इशारा अक्षय पाटील आणि अनिकेत गुरव यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.