भंडीशेगांव येथे विविध विकास कामाचे उदघाट्न 

पंढरपूर प्रतिनिधी गावांनी निवडणुकीत राजकारण करावे पण निवडणुकीनंतर मात्र सर्वांनी एकत्रित येऊन गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत युवक नेते प्रणव परिचारक यांनी भंडीशेगांव ता.पंढरपूर येथील विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी उपसभापती शिवाजी कोळवले उपस्थित होते. पंचायत समिती सदस्य पल्लवी येलमार यांच्या फंडा मधून मंजूर करण्यात आलेल्या विविध… Continue reading भंडीशेगांव येथे विविध विकास कामाचे उदघाट्न 

दोन वर्षात सरकारी रुग्णालयात झाला हजारो बालकांचा जन्म

उपजिल्हा रुग्णालयाचा गरोदर मातांना आधार चार तालुक्यातील रुग्णांसाठी महत्त्वाचा दुवा पंढरपूर प्रतिनिधी : पंढरपुरातील जिल्हा उपरुग्णालय सर्वसामान्य कुटुंबातील मातांसाठी वरदान ठरताना दिसत आहे.चालू २०२२-२३ या वर्षभरात या रुग्णालयात तब्बल ११८० बालकांचा जन्म झाला आहे तर गतवर्षी २०२१-२२ या वर्षात १३५२ बाळांचा जन्म इथे झाला आहे.चालू वर्षातील ७३९ बालके सिझेरियन द्वारे जन्माला आली असून ४४१ बालके… Continue reading दोन वर्षात सरकारी रुग्णालयात झाला हजारो बालकांचा जन्म

बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीची खरेदी

मोहोळ पोलीस ठाण्यात संबधीतावर गुन्हा दाखल लाईव्ह मराठी मोहोळ-  १३ वर्षांपूर्वी मयत असलेल्या महिलेच्या नाववरील कुरुल (ता.मोहोळ) येथील जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून खरेदी केल्या प्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात पाच जणावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोहोळ पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार कुरुल येथील वनमाला विठ्ठलराव गोळे यांच्या नावावर कुरुल येथील गट नं ९९२ मध्ये… Continue reading बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीची खरेदी

लॉजवर चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर धाड

लॉज मालकासह महिला व ग्राहकास अटक मंगळवेढा तालुक्यात खळबळ लाईव्ह मराठी मंगळवेढा मंगळवेढा : रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील लेंडवे चिंचाळे परिसरामध्ये असलेल्या लाॅज वर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत अवैध वेश्याव्यवसाय करीत असलेल्या प्रकरणी पिडीत महिला व बनावट ग्राहक,लाॅज मालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सादर घटनेने तालुक्यात खळबळ माजली आहे. या महामार्गावर सध्या नवनवीन… Continue reading लॉजवर चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर धाड

सोलापूरचे पालकत्व स्वीकारले आहे; उजनीचे पाणी वाचवा

उजनी संघर्ष समितीने केली आजी पालकमंत्र्याकडे माजी पालकमंत्र्यांची तक्रार पंढरपूर प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व योजना बारामती आणि इंदापूर तालुक्यासाठी पळविल्या. याचाच एक प्रमुख भाग म्हणजे उजनीचे पाणी पळविण्याचा घाट बांधला. महाविकास आघाडी सरकारने जाणून-बुजून हे पाप केले असून सोलापूर जिल्ह्याला यामुळे मोठे नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे.… Continue reading सोलापूरचे पालकत्व स्वीकारले आहे; उजनीचे पाणी वाचवा

तुंगतच्या महिलांचा दारुबंदीसाठी पुढाकार

महिलांच्या ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर  बाटली आडवी करण्यासाठी  व व्यसनाधिनतेविरोधत महिला ग्रामसभेत  संतप्त पालखी मार्गावरील पुल सोयीच्या ठिकाणी करण्याचीही मागणी पंढरपूर (प्रतिनिधी) : गावच्या विकासात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी तुंगत ता पंढरपूर येथील  ग्रामपंचायतकडून प्रयत्न केले जात आहेत. समस्या मांडण्यासाठी महिलांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याने गावातील व्यसनाधितेवर महिलांनी आवाज उठविला आहे. महिलांच्या विशेष ग्रामसभेत ‘दारुबंदीचा’… Continue reading तुंगतच्या महिलांचा दारुबंदीसाठी पुढाकार

मिनी ऑलिंपिक स्पर्धेत स्वेरीच्या नम्रता घुले यांना तिहेरी गोल्ड मेडल

सोलापूर विद्यापीठातर्फे ‘सेपक टकरा’ या क्रीडा प्रकारात सहभाग पंढरपूर प्रतिनिधी  – नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडा संकुल मध्ये झालेल्या मिनी ऑलिंपिक स्पर्धेत ‘सेपक टकरा’ या क्रीडा प्रकाराच्या अंतिम सामन्यात सोलापूरच्या महिला संघाने नाशिक महिला संघाचा पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. यामध्ये स्वेरीच्या नम्रता दिगंबर घुले यांनी विशेष खेळी साकारत या स्पर्धेत आपली मोहोर… Continue reading मिनी ऑलिंपिक स्पर्धेत स्वेरीच्या नम्रता घुले यांना तिहेरी गोल्ड मेडल

बचाव समितीने संकल्प पूर्ती निमित्ताने केला आनंद उत्सव साजरा

आदिनाथ कारखान्यात निर्माण पहिल्या उत्पादित साखरेतून!,आदिनाथ महाराजाला महाप्रसादाचा भंडारा!!! मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत या दोघांचे बचाव समितीने मानले आभार!! करमाळा ( प्रतिनिधी) आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामतीच्या तावडीतून सोडून तो पुन्हा करमाळा तालुक्यातील सभासदांच्या मालकीचा व्हावा या मागणीसाठी आदिनाथ बचाव समितीची पहिली बैठक आदिनाथ महाराजांच्या मंदिरात संगोबा येथे झाली होती यावेळी आदिनाथ चे… Continue reading बचाव समितीने संकल्प पूर्ती निमित्ताने केला आनंद उत्सव साजरा

तानाजी सावंत यांना डाटा एंट्री ऑपरेटरचे निवेदन

डाटा एंट्री ऑपरेटरांना राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये समाविष्ट करण्यासाठी व विविध मागण्यासाठी ना. तानाजी सावंत यांना निवेदन पंढरपूर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात आरोग्य विभागत ७ ते ८ हजार ऑपरेटर मे यशस्वी फॉर स्कील या कंपनी कडून कार्यरत आहे आत्ता बघता बघता एक ते दीड वर्ष झाले आहेत दीड वर्षानंतर करार संपणार मग करार संपल्यावर काय होईल… Continue reading तानाजी सावंत यांना डाटा एंट्री ऑपरेटरचे निवेदन

संक्रांतीनिमित्त रुक्मिणीमातेच्या नित्योपचारात बदल

पंढरपूर प्रतिनिधी श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या मंदिरामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे दि.14 ते दि.16 जानेवारी 2023 या कालावधीत मकर संक्रांत उत्सव साजरा होत आहे. या उत्सव कालावधीत महिला भाविकांची होणारी गर्दी विचारात घेता, महिला भाविकांना श्री.रूक्मिणीमातेस भोगी करण्यासाठी भोगीच्या दिवशी (शनिवार, दि.14जानेवारी 2023 रोजी) श्री. रूक्मिणीमातेची काकडा आरती व नित्यपूजा पहाटे 3.00 ते 4.00 या वेळेत करण्यात येत असल्याची… Continue reading संक्रांतीनिमित्त रुक्मिणीमातेच्या नित्योपचारात बदल

error: Content is protected !!