अमरनाथ दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू, पुण्यातील दोघे अडकले

जम्मू-काश्मीर (वृत्तसंस्था) : अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीसदृश पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू  झाला आहे, तर ५० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. याशिवाय काही लोक बेपत्ता असल्याचीही माहिती आहे. राष्ट्रीय आपत्ती निवार दल, राज्य आपत्ती  निवारण दलाचे जवान तसेच पोलीस आणि नागरी प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी आणि इंडो-तिबेटियन सीमा पोलिसांचे जवानही मदतकार्यात सहभागी झाले आहेत. ही… Continue reading अमरनाथ दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू, पुण्यातील दोघे अडकले

शिंजो आबे यांची हत्या : देशात उद्या राष्ट्रीय दुखवटा

नवी दिल्ली : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची जपानमध्ये एका सार्वजिनक सभेदरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. आबे हे भारताचे शुभचिंतक आणि मित्र म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच आबे यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी भारतात उद्या शनिवार, दि. ९ जुलै रोजी एक दिवसीय राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र… Continue reading शिंजो आबे यांची हत्या : देशात उद्या राष्ट्रीय दुखवटा

मुख्तार नकवी यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी न दिल्याने मुख्तार अब्बास नकवी यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागेल, अशी चर्चा सुरू झाली होती. नकवी यांनी आज (बुधवारी) अल्पसंख्याक व्यवहार मंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधान मोदी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपला आहे. नकवी यांचे नाव भाजपकडून उपराष्ट्रपती किंवा राज्यपालपदासाठी पुढे केले जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान… Continue reading मुख्तार नकवी यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा

लोकसभेतील प्रतोदपदावरुन भावना गवळी यांना हटवले

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटाची लढाई आता राज्यातून थेट दिल्लीमध्ये पोहोचल्याचे चित्र आहे. आपण भाजपसोबत गेले पाहिजे, अशी मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना शिवसेनेने लोकसभेतील प्रतोदपदावरुन हटवले आहे. त्यांच्या ठिकाणी आता खासदार राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र शिवसेने नेते संजय राऊत यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना दिले आहे. शिवसेनेचे… Continue reading लोकसभेतील प्रतोदपदावरुन भावना गवळी यांना हटवले

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती स्थिर

पाटणा (वृत्तासंस्था) : ‘राजद’ चे सुप्रीम लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यांना लवकरच हवाई रुग्णवाहिकेने दिल्लीस्थित एम्स रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. मागील तीन दिवसांपासून त्यांच्यावर पाटणास्थित पारस रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तिथे त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आसिफ रहमान यांनी दिली. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि… Continue reading लालू प्रसाद यादव यांची प्रकृती स्थिर

आयात शुल्क १५ टक्के वाढल्याने सोने वधारले

नवी दिल्ली (वृत्त्संस्था) : केंद्र सरकारने सोन्याच्या आयातीवर नियंत्रण आणण्यासाठी आयात शुल्क १०.२५ वरून ४.२५ टक्के वाढवून १५ टक्के केले आहे. या निर्णयामुळे सोन्याच्या आयातीवर सर्व शुल्कांसह एकूण कर वाढून १८.४५ टक्के इतका झाला आहे. जो आधी १४.०७ होता. नवे दर ३० जूनपासून लागू होणार आहेत. जगात भारत चीननंतर सोन्याचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक आहे.… Continue reading आयात शुल्क १५ टक्के वाढल्याने सोने वधारले

नव्या वेतन संहितेत कामाचे तास वाढणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार नवीन वेतन संहिता म्हणजे नवे वेज कोड लागू करणार आहे. यापूर्वी ते १ एप्रिल २०२१ पासून नवे वेज कोड लागू होणार होते. त्यानंतर ऑक्टोबरपासून ते लागू करण्यात येणार होते; परंतु विविध राज्य सरकारांच्या काही मुद्द्यांमुळे त्याची अंमलबजावणी झाली नाही. कारण राज्य सरकारांनाही याच्या अंमलबजावणीची तयारी करायची होती. आता हा… Continue reading नव्या वेतन संहितेत कामाचे तास वाढणार

शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्याकडे रवाना

गुवाहाटी (वृत्तसंस्था) : बुधवारी सायंकाळी पाच वाजल्यानंतर एका खासगी विमानाने एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्याकडे रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह ५१ आमदार हे गोव्यामध्ये ‘ताज कन्व्हेन्शन’ या हॉटेलमध्ये थांबतील आणि गुरुवारी सकाळी मुंबईला पोहचतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गोव्यातील ‘ताज कन्व्हेन्शन या हॉटेलमध्ये ७१ खोल्या राखीव करण्यात आलेल्या आहेत. यानंतर बंडखोर आमदारांसह… Continue reading शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्याकडे रवाना

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला उद्या भेट देणार : एकनाथ शिंदे

गुवाहाटी (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे बंडखोर आमदार गुरुवारी, ३० जून रोजी परतल्यावर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार असल्याचे शिवसेनेच्या बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.  बंडखोर आमदार उद्या गुरुवारी सकाळी मुंबईत दाखल होणार आहेत. त्यामुळे शिवसैनिक आणि बंडखोर आमदारांचे समर्थक आमनेसामने येण्याची शक्यता आहे. शिवसेना बंडखोर आमदारांनी बुधवारी कामाख्या मंदिरात… Continue reading बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला उद्या भेट देणार : एकनाथ शिंदे

ते’ शरद पवारांना सोडायला तयार नाहीत : गुलाबराव पाटील

गुवाहाटी (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व सोडले असले तरी ते शरद पवारांना सोडायला तयार नाहीत, असे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर आमदार हे गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये मुक्कामास आहेत. त्या ठिकाणी आमदार हे संवाद साधत आहे. बुधवारी झालेल्या एका संवादात आमदार गुलाबराव पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांना सवाल… Continue reading ते’ शरद पवारांना सोडायला तयार नाहीत : गुलाबराव पाटील

error: Content is protected !!