गुवाहाटी (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे बंडखोर आमदार गुरुवारी, ३० जून रोजी परतल्यावर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार असल्याचे शिवसेनेच्या बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. 

बंडखोर आमदार उद्या गुरुवारी सकाळी मुंबईत दाखल होणार आहेत. त्यामुळे शिवसैनिक आणि बंडखोर आमदारांचे समर्थक आमनेसामने येण्याची शक्यता आहे. शिवसेना बंडखोर आमदारांनी बुधवारी कामाख्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटले. आमच्याकडे दोन तृतीयांश आमदार असून, कोणावरही बळजबरी केली नसल्याचे म्हटले आहे.