‘गोष्ट एका पैठणीची’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. यंदा ६८ व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे. अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता शशांक केतकर याच्या भूमिका असेलल्या ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा, तर राहुल देशपांडे यांना ‘मी वसंतराव’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.… Continue reading ‘गोष्ट एका पैठणीची’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

द्रौपदी मुर्मू यांचा संघर्षमय जीवनप्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पतीचे निधन, दोन मुलांचा मृत्यू अशी दु:खे पचवत द्रौपदी मुर्मू यांच्या जीवनात संघर्षाची वाटचाल करत त्या आता राष्ट्रपतीपदावर विराजमान होत आहेत. झारखंडच्या राज्यपाल राहिलेल्या आणि आता देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांचा जीवन प्रवास निश्चितच सोपा नव्हता. शिक्षक, क्लर्क, नगरसेवक, राज्यपाल आणि आता राष्ट्रपतीपदांपर्यंत पोहोचताना त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात… Continue reading द्रौपदी मुर्मू यांचा संघर्षमय जीवनप्रवास

देशाच्या नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांनी बाजी मारली आहे. त्यांनी विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. द्रौपदी मुर्मू यांना ८१२ मते, तर यशवंत सिन्हा यांना ५२१ मते मिळाली आहेत. राष्ट्रपतीपदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला असतील. द्रौपदी मुर्मू या २४ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ… Continue reading देशाच्या नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांची विजयाकडे वाटचाल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. आज मतमोजणीच्या पहिल्या फेरीत बहुतांश खासदारांनी मुर्मू यांना पसंती दिली आहे. एकूण दोन फेऱ्यांमधील ६,७३,१७५ मूल्यांची १८८६ वैध मतांची मोजणी झाली. त्यात द्रौपदी मुर्मू यांना ४,८३,२९९ मूल्यांसह १३४९ मते आणि यशवंत सिन्हा यांना १,८९,८७६ मूल्यांसह ५३७… Continue reading राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांची विजयाकडे वाटचाल

शेवाळे यांची गटनेतेपदी केलेली नियुक्ती चुकीची : राऊत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेना आणि शिंदे गटात आता लोकसभेतील गटनेते पदावरुन वाद निर्माण झाला आहे. लोकसभा अध्यक्षांनी राहुल शेवाळे यांची लोकसभेच्या गटनेतेपदी केलेली नियुक्ती चुकीची आहे. हा शिवसेनेवर अन्याय आहे. हा नैसर्गिक न्याय नाही, असे शिवसेना नेते विनायक राऊत यांनी म्हटले आहे. शिंदे गटाने लोकसभेतील गटनेतेपदावर दावा करणारे पत्र लोकसभा अध्यक्षांना १९ जुलै रोजी… Continue reading शेवाळे यांची गटनेतेपदी केलेली नियुक्ती चुकीची : राऊत

सोनिया गांधी यांची आजची चौकशी संपली; काँग्रेसचे आंदोलन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज (गुरुवारी) ईडीसमोर तीन तास चौकशी झाली. गरज वाटल्यास त्यांना पुन्हा सोमवारी चौकशीसाठी बोलावण्यात येण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत राहुल आणि प्रियांका गांधी हे दोघेही होते. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून याविरोधात देशभर आंदोलन केले. काँग्रेसचे कार्यकर्ते सकाळपासून याविरोधात आक्रमक होत आंदोलन करत आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री… Continue reading सोनिया गांधी यांची आजची चौकशी संपली; काँग्रेसचे आंदोलन

उत्तरप्रदेशातील जलसंपदा मंत्र्याचा राजीनामा

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील जलसंपदा राज्यमंत्री दिनेश खटीक यांनी राजीनामा दिल्याने योगी सरकारच्या मंत्रिमंडळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, तीन मंत्री राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा काही दिवसांपासून सोशल मीडियावरुन सुरु आहे. खटीक यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. ते काही महिन्यापासून नाराज होते. ‘मी दलित असल्याने मला अधिकाऱ्यांकडून योग्य वागणूक मिळत… Continue reading उत्तरप्रदेशातील जलसंपदा मंत्र्याचा राजीनामा

बांठिया आयोगाच्या शिफारशीनुसार निवडणुका घ्या : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने सादर केलेला बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारत सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसी समाजाला मोठा दिलासा मिळाला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली होती.… Continue reading बांठिया आयोगाच्या शिफारशीनुसार निवडणुका घ्या : सुप्रीम कोर्ट

आमदार अपात्रतेची सुनावणी आता १ ऑगस्टला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :   महाराष्ट्रातील राजकीय संकटाचा आज (बुधवारी) फैसला होऊ शकलेला नाही. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर शिंदे गटाच्या वकिलांनी कागदपत्रांसाठी मुदत देण्याची मागणी केली. त्यानंतर शिवसेनेच्या वकिलांकडून हरकत घेण्यात आली. आता सर्वोच्च न्यायालयाने आता १ ऑगस्टला आमदार अपात्रतेची पुढील सुनावणी होणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान,  या प्रकरणी सर्व पक्षकारांनी २७ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्राची कागदपत्रे… Continue reading आमदार अपात्रतेची सुनावणी आता १ ऑगस्टला

भाजपसोबत युतीसाठी चारवेळा चर्चा : खासदार शेवाळे

नवी दिल्ली : भाजपसोबतच्या युतीसाठी आतापर्यंत चारवेळा चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणी झाली होती, असा गौप्यस्फोट खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. शेवाळे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर ठाकरे आणि मोदी या दोघांत दिल्लीत स्वतंत्रपणे चर्चा झाली होती. त्यावेळी ठाकरे यांनी पुन्हा भाजपसोबत जाण्याचे सूतोवाच केले होते; मात्र जून… Continue reading भाजपसोबत युतीसाठी चारवेळा चर्चा : खासदार शेवाळे

error: Content is protected !!