आमदार अपात्रतेची सुनावणी आता १ ऑगस्टला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :   महाराष्ट्रातील राजकीय संकटाचा आज (बुधवारी) फैसला होऊ शकलेला नाही. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर शिंदे गटाच्या वकिलांनी कागदपत्रांसाठी मुदत देण्याची मागणी केली. त्यानंतर शिवसेनेच्या वकिलांकडून हरकत घेण्यात आली. आता सर्वोच्च न्यायालयाने आता १ ऑगस्टला आमदार अपात्रतेची पुढील सुनावणी होणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान,  या प्रकरणी सर्व पक्षकारांनी २७ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्राची कागदपत्रे… Continue reading आमदार अपात्रतेची सुनावणी आता १ ऑगस्टला

भाजपसोबत युतीसाठी चारवेळा चर्चा : खासदार शेवाळे

नवी दिल्ली : भाजपसोबतच्या युतीसाठी आतापर्यंत चारवेळा चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणी झाली होती, असा गौप्यस्फोट खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. शेवाळे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर ठाकरे आणि मोदी या दोघांत दिल्लीत स्वतंत्रपणे चर्चा झाली होती. त्यावेळी ठाकरे यांनी पुन्हा भाजपसोबत जाण्याचे सूतोवाच केले होते; मात्र जून… Continue reading भाजपसोबत युतीसाठी चारवेळा चर्चा : खासदार शेवाळे

नामांतराचा प्रस्ताव महाराष्ट्राने केंद्राकडे पाठवलेला नाही

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल राज्यासह देशातील ७ शहरांच्या नावामध्ये बदल करण्यास मंजुरी दिल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली; मात्र यात महाराष्ट्रातील औरंगाबाद व उस्मानाबादच्या बहुचर्चित नामांतराबाबतचा उल्लेख सरकारने केलेला नाही. याबाबत राज्य सरकारकडून आधी प्रस्ताव यावा लागतो. महाराष्ट्रातील सरकारकडून अद्याप तसा प्रस्ताव आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारने औरंगाबाद, उस्मानाबाद… Continue reading नामांतराचा प्रस्ताव महाराष्ट्राने केंद्राकडे पाठवलेला नाही

डाळी, गहू, तांदूळसह काही वस्तूंवरील जीएसटी मागे

नवी दिली (वृत्तसंस्था) : महागाईच्या झळा पोहोचत असताना केंद्र सरकारने जीएसटीच्या कक्षेत नसणाऱ्या गोष्टींवर जीएसटी आकारायचा निर्णय घेतल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे आता जनतेच्या रोषाची दखल घेत आता केंद्र सरकारने काही वस्तूंवर जीएसटी आकारण्याचा निर्णय मागे घेतला आहे. सुट्या डाळी, गहू, मोहरी, ओट्स, मका, तांदूळ, पीठ, रवा, बेसन, दही आणि लस्सी यावर आता जीएसटी… Continue reading डाळी, गहू, तांदूळसह काही वस्तूंवरील जीएसटी मागे

कोल्हापूरचे दोन्ही खासदार मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमवेत दिल्लीत

सरकारच्या भवितव्याच्या अस्वस्थेतून मुख्यमंत्री दिल्लीत : राऊत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उद्या बुधवारपासून सुप्रीम कोर्टात सरकारच्या भवितव्याचा फैसला कऱणारी सुनावणी होणार आहे. त्याच अस्वस्थेतून मुख्यमंत्री दिल्लीत आले आहेत. काही प्रमुख नेत्यांना भेटत आहेत; पण कोर्टावर दबाव आणण्याचा प्रयत्न जरी झाला तरी आजही सुप्रीम कोर्टात रामशास्त्री बाण्याचे काही न्यायाधीश आहेत. त्यांच्याकडून न्यायाचा खून होणार नाही, याची खात्री आहे,’ असा विश्वास संजय राऊत यांनी… Continue reading सरकारच्या भवितव्याच्या अस्वस्थेतून मुख्यमंत्री दिल्लीत : राऊत

शिवसेनेचे १८ खासदार आपल्याबरोबर : शिंदे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  शिवसेनेचे १४ नव्हेच, तर १८ खासदार आपल्याबरोबर आहेत. सर्वजण येणार असून, त्यांची भेट घेणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे हे मध्यरात्री दोनच्या सुमारास दिल्लीत दाखल झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करत शिंदे गटाने आपली स्वत:ची कार्यकारिणी जाहीर… Continue reading शिवसेनेचे १८ खासदार आपल्याबरोबर : शिंदे

राष्ट्रपतीपदासाठी उत्साहात मतदान, २१ रोजी निकाल

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदासाठी आज (सोमवारी) निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. यामध्ये संसदेतील ९९.१८ टक्के खासदारांनी मतदानाचा अधिकार बजावला असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली, तर महाराष्ट्रातील २८३ आमदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल २१ जुलै रोजी लागणार आहे, तर २५ जुलै रोजी नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होईल. राष्ट्रपतीपदासाठी संध्याकाळी पाच वाजता मतदान संपले. या… Continue reading राष्ट्रपतीपदासाठी उत्साहात मतदान, २१ रोजी निकाल

मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये एस.टी. बस कोसळून १३ ठार

इंदौर (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील इंदूर-खरगोनदरम्यान सोमवारी सकाळी मोठा अपघात झाला. इंदौरहून पुण्याला जाणारी बस सकाळी १०.४५ वाजता धामनोद येथील खलघाटाजवळ नर्मदा नदीत पडली. बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह ५० ते ५५ प्रवासी होते. आतापर्यंत १३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यामध्ये ७ पुरुष आणि ४ महिलांचे मृतदेह आहेत. मृतांची ओळख अद्याप पटलेली… Continue reading मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये एस.टी. बस कोसळून १३ ठार

सोमवारपासून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार

नवी दिल्ली : सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसणार आहे. पुढील आठवड्यापासून अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती  वाढणार आहेत. अशा परिस्थितीत, घरगुती वस्तू, हॉटेल, बँक सेवा आणि बरेच काही यावर अधिक खर्च करावा लागणार आहे. दि. १८ जुलैपासून अनेक जीवनावश्यक वस्तू आणि सेवांच्या किमती वाढणार आहेत. चंदीगडमध्ये झालेल्या दोन दिवसीय ४७ व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत केलेल्या… Continue reading सोमवारपासून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार

error: Content is protected !!