देशाचे नवे उपराष्ट्रपती जगदीप धनखड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या १६ व्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सत्तारूढ भारतीय जनता पक्ष आघाडीचे (एनडीए) उमेदवार जगदीप धनखड यांचा अपेक्षेप्रमाणे दणदणीत विजय झाला. ७१ वर्षीय धनखड यांना पाहिल्या पसंतीची तब्बल ५२८  तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना १८२  मते मिळाली. १५  मते बाद झाली. शनिवारी झालेल्या मतदानानंतर सायंकाळी ६ वाजता मतमोजणीला सुरुवात… Continue reading देशाचे नवे उपराष्ट्रपती जगदीप धनखड

देशभर महागाईविरोधात काँग्रेसची निदर्शने

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : महागाई, जीएसटी आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसतर्फे शुक्रवारी रस्त्यापासून संसदेपर्यंत निदर्शने सुरू आहेत. दिल्ली, पाटणा, मुंबई, भोपाळसह देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी महागाईविरोधात निदर्शने केली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अकबर रोडवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पोलिसांनी तीन स्तरांमध्ये बंदोबस्त लावला आहे. कोणत्याही कार्यकर्त्याला आत प्रवेश दिला गेला नाही. सोनिया, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे… Continue reading देशभर महागाईविरोधात काँग्रेसची निदर्शने

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर ८ ऑगस्ट रोजी सुनावणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज (गुरुवारी) सलग दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने आता पुन्हा या प्रकरणी सोमवारी सुनावणी करणार असल्याचे स्पष्ट केले. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वातील आजची सुनावणी पार पडली. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत, तर शिंदे गटाकडून हरीश साळवे, नीरज किशन कौल आणि… Continue reading महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर ८ ऑगस्ट रोजी सुनावणी

अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन.

लखनऊ (वृत्तसंस्था): बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे काल लखनऊ येथे निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून ह्रदयविकाराचा सामना करत होते. मिथिलेश चतुर्वेदी यांचे जावई आशीष यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन मिथिलेश यांना श्रद्धांजली वाहिली.  मिथिलेश चतुर्वेदी यांचे जावई आशीष यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले, तुम्ही जगातील सर्वोत्तम वडील होते. तुम्ही माझ्यावर… Continue reading अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर उद्या सुनावणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सत्तासंघर्षावरून सुरू असलेला वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. आजची सुनावणी नुकतीच संपली असून, उद्या गुरुवारी पुन्हा याप्रकरणी सुनावणी होणार आहे. दोन्ही गटातील वकिलांनी आज जोरदार युक्तिवाद केला. आप-आपली मते मांडताना दोन्ही गटांनीही कायदेशीर दाखले दिले. मूळ राजकीय पक्षाची व्याखाच ठाकरे गटाच्या कपिल सिब्बल यांनी वाचून दाखवली तर, शिंदे गटाने सादर केलले्या… Continue reading महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर उद्या सुनावणी

काँग्रेसच्या चार खासदारांचे निलंबन मागे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ सुरूच आहे. आज सोमवारी सलग दोनवेळा लोकसभेचे कामकाज तहकूब केल्यानंतर काँग्रेसच्या चार खासदारांचे निलंबन मागे घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. खासदारांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे लोकसभेतील गोंधळ संपला असून, वाढत्या महागाईबाबत सभागृहात चर्चा सुरू होणार आहे. गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत… Continue reading काँग्रेसच्या चार खासदारांचे निलंबन मागे

सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात जुगलबंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यात संसदेच्या आवारात खटके उडाल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाला तेव्हा सोनिया स्मृतींना म्हणाल्या, ‘डोंट टॉक टू मी’, तर सोनियांनी भाजपच्या महिला खासदारांना धमकावल्याचा आरोप अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे. सोनिया गांधी संसदेच्या संकुलात असताना भाजपच्या… Continue reading सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात जुगलबंदी

ओबीसी आरक्षणाविनाच निवडणुका होणार

नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टाच्या हिरव्या कंदिलानंतर पुन्हा सर्व निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याच्या हालचाली राज्य शासनाने सुरु केल्या होत्या; पण आता सुप्रीम कोर्टाने यावर महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार आदेशापूर्वी ज्या निवडणुका जाहीर झाल्या, त्या ओबीसी आरक्षणाविनाच होतील, असे कोर्टाने म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच स्पष्ट केले होते की, ज्या निवडणुका जाहीर झालेल्या… Continue reading ओबीसी आरक्षणाविनाच निवडणुका होणार

मोकळ्या मैदानात येऊन बोला; ठाकरेंना दानवेंचा टोला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंद खोलीत मुलाखत काय देता, मोकळ्या मैदानात या, लोकांच्यासमोर भाषण करा, या फिक्स मॅचला लोक आता कंटाळले आहेत, असा टोला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे. मुलाखत घ्यायचीच असेल तर राऊतांनी एकनाथ शिंदे, फडणवीस, राज ठाकरे यांची देखील घ्यावी, असे आवाहन देखील दानवेंनी केले. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना रावसाहेब दानवे… Continue reading मोकळ्या मैदानात येऊन बोला; ठाकरेंना दानवेंचा टोला

सोनिया गांधी यांची तीन दिवसांत ११ तास चौकशी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आजची चौकशी संपली आहे. केंद्रीय एजन्सी ईडीने आज त्यांची सुमारे तीन तास चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले. पुढील चौकशीसाठी सोनिया गांधी यांना नव्याने समन्स बजावण्यात आलेले नाही. गेल्या तीन दिवसांत सोनिया गांधी यांची तब्बल ११ तास चौकशी करण्यात आली आहे. ७५ वर्षीय… Continue reading सोनिया गांधी यांची तीन दिवसांत ११ तास चौकशी

error: Content is protected !!