‘हे’ तर मी ३० वर्षांपासून ऐकतोय ! : शरद पवारांचा शिवसेनेला टोला

नाशिक (प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्थांवर एकहाती शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (मंगळवार) मातोश्रीवर झालेल्या सर्व जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत केले होते. यावरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. स्वबळावर भगवा फडकवणार हे मी गेल्या ३० वर्षांपासून ऐकत आलो आहे, त्यात नवीन काही नाही, असे त्यांनी म्हटले… Continue reading ‘हे’ तर मी ३० वर्षांपासून ऐकतोय ! : शरद पवारांचा शिवसेनेला टोला

कुमार सानूच्या मुलाचा मस्तवालपणा : ‘बिग बॉस’मध्ये मराठी भाषेचा अवमान

मुंबई (प्रतिनिधी) : कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या ‘बिग बॉस’ रिअॅलिटी शोमध्ये जान कुमार सानूनं मराठी भाषेबद्दल अवमानकारक वक्तव्य केले. जान हा प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा आहे. यामुळे सर्व थरातून संताप व्यक्त करण्यात होत आहे. शिवसेना आणि मनसेने कलर्स वाहिनीला सानूला या शोमधून हाकलण्याची मागणी केली आहे. राज्यात उमटलेल्या प्रक्षुब्ध भावनांचा विचार करून कलर्स वाहिनीने… Continue reading कुमार सानूच्या मुलाचा मस्तवालपणा : ‘बिग बॉस’मध्ये मराठी भाषेचा अवमान

राज्यातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देणार मोफत !

औरंगाबाद (प्रतिनिधी) : राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली असली तरी अद्याप धोका टळलेला नाही. त्यामुळे सरकारकडून वारंवार सुरक्षित वावराचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीसाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. ही लस कधी मिळणार हे निश्चित नसले तरी राज्य सरकारने मात्र सर्व नागरिकांना मोफत लस दिली जाईल, अशी घोषणा केली… Continue reading राज्यातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देणार मोफत !

नवरात्रोत्सवाचा सातवा दिवस : करवीरनिवासिनी श्री अंबामातेची महापूजा – ‘अगस्त्य’कृत सरस्वती स्तवन स्वरूपात (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी आज (शुक्रवार) करवीरनिवासिनी श्री अंबामातेची अगस्त्यकृत सरस्वती स्तवन स्वरुपात महापूजा बांधण्यात आली. करवीर माहात्म्य हा ग्रंथ उलगडतो तो अगस्ती आणि लोपामुद्रा ऋषी दाम्पत्याच्या संवादातून. श्रींची पालखी आजही ज्या घाटी दरवाजाजासमोरील दीपमाळेला प्रदक्षिणा घालते, तिथे या दोघांच्या मूर्ती आहेत. करवीरात एके काळी प्रचलित असलेल्या श्री विद्या म्हणजेच श्री यंत्र… Continue reading नवरात्रोत्सवाचा सातवा दिवस : करवीरनिवासिनी श्री अंबामातेची महापूजा – ‘अगस्त्य’कृत सरस्वती स्तवन स्वरूपात (व्हिडिओ)

पूर, अतिवृष्टीधारकांसाठी १० हजार कोटींची मदत जाहीर  

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील पूर, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकरी, नागरिकांसाठी राज्य सरकारने आज (शुक्रवार) १० हजार कोटींची मदत जाहीर केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली. ही मदत खरडून गेलेल्या शेती आणि शेतीच्या नुकसानीसाठी असणार आहे. दिवाळीपर्यंत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ही मदत पोहोच करण्याचे नियोजन सरकारने केले आहे. राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी आज मुख्यमंत्री… Continue reading पूर, अतिवृष्टीधारकांसाठी १० हजार कोटींची मदत जाहीर  

कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका : दिल्लीत उपचार सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार, अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीने नवी दिल्ली येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर त्वरित अँँजिओप्लास्टी करण्यात येणार आहे. या वृत्ताने त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. भारतीय क्रिकेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक… Continue reading कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका : दिल्लीत उपचार सुरू

खडसेंविरोधातील आरोपांसाठी फडणवीस नव्हे, चंद्रकांत पाटलांनी मदत केली..!

मुंबई (प्रतिनिधी) : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांनी काल त्यांच्याविषयी केलेल्या विधानांवरून खडसे यांच्यावर हल्लाबोल केलाय. त्यांनी एका सभेत माझ्याविरुद्ध अत्यंत घाणेरडे विधान केले होते. त्यामुळेच मी त्यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. हा खटला संपलेला नाही, त्यामुळे तो संपल्याचे जे ते सांगतात ते खोटे आहे. खडसेंविरोधात मी जे काही आरोप केले… Continue reading खडसेंविरोधातील आरोपांसाठी फडणवीस नव्हे, चंद्रकांत पाटलांनी मदत केली..!

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईला तिरुपती देवस्थानकडून शालू सुपूर्द ! (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी तिरुपती देवस्थान ट्रस्टकडून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईस शालू सुपूर्द करण्यात आला. गुलाबी काठ असलेला हा शालू  राखाडी रंगाचा असून त्याची किंमत एक लाख पाच हजार सहाशे रुपये आहे. आज (गुरुवार) दुपारी तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आ. भास्कर रेड्डी, ट्रस्टचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बाराव रेड्डी… Continue reading करवीरनिवासिनी श्री अंबाबाईला तिरुपती देवस्थानकडून शालू सुपूर्द ! (व्हिडिओ)

नवरात्रोत्सवाचा सहावा दिवस : करवीरनिवासिनी श्री अंबामातेची ‘काशीविश्वेश्वरांना दर्शन’ स्वरूपात महापूजा (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवाचा आज (गुरुवार) सहावा दिवस. आज करवीरनिवासिनी श्री अंबामातेची ‘काशीविश्वेश्वरांना दर्शन’ स्वरूपात महापूजा बांधण्यात आली. करवीर क्षेत्रात असलेले दशाश्वमेध तीर्थ व त्यांचे महत्त्व श्रीशिव पार्वतीला सांगतात व उमेसह करवीरक्षेत्री राहण्यासाठी क्षेत्रदेवतेची म्हणजेच श्री महालक्ष्मीची स्तुती करून परवानगी मागतात. तेव्हा श्री महालक्ष्मी श्री शिवाला तिच्या उजव्या हाताच्या दिशेला वास करण्यास व येथील प्रत्येक… Continue reading नवरात्रोत्सवाचा सहावा दिवस : करवीरनिवासिनी श्री अंबामातेची ‘काशीविश्वेश्वरांना दर्शन’ स्वरूपात महापूजा (व्हिडिओ)

आता पोलिसांचा पगार ‘एचडीएफसी’ बँकेतून…

मुंबई (प्रतिनिधी) : मंत्रालयीन कर्मचारी आणि मुंबई पोलिसांचे पगार आता एचडीएफसी बॅंकेत जमा होणार आहेत. या बँकेकडून पोलिसांना आता लाखो नाही तर कोट्यवधींचे विमा संरक्षण मिळणार आहे. अ‍ॅक्सिस बँकेशी झालेल्या कराराची मुदत संपल्यानंतर आता एचडीएफसी बॅंकेशी राज्य सरकारने करार केला आहे.  देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१५ साली अ‍ॅक्सिस बँकेत मुंबई पोलिसांचे पगार करण्याबाबत करार करण्यात… Continue reading आता पोलिसांचा पगार ‘एचडीएफसी’ बँकेतून…

error: Content is protected !!