कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी तिरुपती देवस्थान ट्रस्टकडून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईस शालू सुपूर्द करण्यात आला. गुलाबी काठ असलेला हा शालू  राखाडी रंगाचा असून त्याची किंमत एक लाख पाच हजार सहाशे रुपये आहे. आज (गुरुवार) दुपारी तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आ. भास्कर रेड्डी, ट्रस्टचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बाराव रेड्डी यांच्या पत्नी सौ. लक्ष्मी रेड्डी, विश्वस्त सौ. प्रशांती रेड्डी यांनी हा शालू देवस्थान समितीकडे सुपूर्द केला.

 

 

त्यानंतर देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोषाध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर, सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, उपसचिव सौ. शीतल इंगवले, व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्या उपस्थितीत मंदिरात देण्यात आला. या वेळी सौ. स्वर्णलता रेड्डी, सौ. सुषमा जेट्टी, सौ. जया रेड्डी आणि सौ. अपर्णा रेड्डी यांच्यासह देवस्थान समितीचे कर्मचारी उपस्थित होते.